असे अनके प्राणी आहेत ज्यांचे डोळे अंधारात चमकू लागतात. मांजर, कुत्रा, गाय किंवा अन्य प्राण्यांना पाहिले असेल. पण असं का होतं यामागचं कारण अनेकांना माहित नसतं.
बहुतांश प्राण्यांच्या डोळ्यांच्या रेटीनामागे एक विशिष्ट प्रकारचे टिशू असतात ज्यावा टेपटम लूसिडम असं म्हणतात आणि हेच टिशू प्राण्यांचे डोळे चमकण्यासाठी कारणीभूत ठरतात. आश्चर्य म्हणजे हे टिशू फक्त प्राण्यांमध्येच असतात, ते माणसांमध्ये विकसित होत नाहीत.
हे टिशू कसे काम करतात? खरंतर हे टिशू प्रकाशाला ग्रहण किंवा शोषून घेतात आणि मग याचाच सिग्नल बनवून त्याला मेंदूपर्यंत पोहोचवतात. ज्यामुळे रात्रीच्या वेळी देखील प्राण्यांना स्पष्ट दिसू शकतं. ज्यामुळेच डोळे रात्रीच्या अंधारात चमकू लागतात.
सर्व प्राण्यांच्या तुलनेत मांजरीचे डोळे जास्त प्रमाणात चमकतात. खरंतर मांजरीच्या डोळ्यातील टेपडम लूसिडम टिशू हे क्रिस्टल सारख्या सेल्सने बनलेल्या असतात.
एखाद्या काचेवर जसा प्रकाश परावर्तित किंवा रिफ्लेक्ट होतो तसा तो डोळ्यांवर देखील होतो आणि प्रकाशाला परत पाठवतो. ज्यामुळे मांजरच काय तर इतर प्राण्यांना समोरील वस्तूची प्रतिमा साफ दिसते.
प्राणीच नाही तर अशाप्रकारचे डोळे माशांचे देखील असतात. पाण्याखाली त्यांना कमी प्रकाशात गोष्टी दिसाव्यात यासाठी त्यांचे डोळे असे विकसित होतात.