NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Women Hygiene : महिलांच्या पँटीवर पांढरा-पिवळा असा डाग का दिसतो?

Women Hygiene : महिलांच्या पँटीवर पांढरा-पिवळा असा डाग का दिसतो?

हे डाग अंडरवेअर वर का पडतात किंवा हे डाग आपल्या शरीराबाबत काय दर्शवतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तर या लेखात जाणून घेऊ.

19

इंटिमेट भागाचं हाइजिन राखणं हे महिला आणि पुरुष दोघांसाठीही महत्वाचं आहे. महिलांसाठी त्यांच्या महत्वाच्या भागाची स्वच्छता करणं तर फारच महत्वाचं आहे. पण अनेक महिलांना याबद्दलची माहिती नसते, तर काही महिला या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण महिलांनी आपले जनेंद्रिय तसेच योनी स्वच्छ ठेवणे फार गरजेचे आहे. अनेक महिला याबद्दल उघडपणे बोलण्यासाठी घाबरतात किंवा त्यांला लाज वाटते. पण याबद्दल जाणून घेणे खरंच महिलांसाठी फायद्याचे आहे.

29

आज आपण अशाच एका मुद्याबद्दल बोलणार आहोत आणि काही तथ्य जाणून घेणार आहोत. ते म्हणजे महिलांच्या पॅन्टी किंवा अंडरवेअरवर कालांतराने पडणारे पिवळे आणि सफेद डाग. आता हे डाग अंडरवेअर वर का पडतात किंवा हे डाग आपल्या शरीराबाबत काय दर्शवतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तर या लेखात जाणून घेऊ.

39

महिलांच्या अंडरवेअरचा मधला भाग हा ब्लिच केलेल्या कापडाप्रमाणे दिसू लागतो. पांढरा- पिवळसर रंगाचा पट्टा या भागात दिसू लागतो. अनेक महिलांना वाटतं की हे कपडा चांगल्या नसल्यामुळे किंवा तो बरोबर धुतला न गेल्यामुळे असं घडतं. पण असं नाही. काहीवेळा योनीतुन होणारा स्त्राव सुद्धा यासाठी कारण आहे.

49

स्त्रीरोग तज्ज्ञांच्या माहितीनुसार, योनीतून स्त्राव होणे हे स्त्री शरीरातील एक सामान्य आणि निरोगी प्रक्रिया आहे. खरं तर, संसर्ग आणि इतर हानिकारक जीवांपासून योनी स्वच्छ करण्याचा हा शरीराचा मार्ग आहे. म्हणजेच असे डाग पडण्याचा अर्थ असा की तुमची योनी साफ आणि स्वच्छ आहे.

59

कधी कधी मासिक पाळी, हार्मोनल बदल आणि संक्रमण यांसारख्या घटकांवर योनीतून येणारा स्त्रावाचा पोत अवलंबून असतो. यावेळी स्त्रावाचा रंग बदलतो आणि त्याला वास देखील येतो, त्यामुळे हे समजून घेणे आवश्यक आहे की अंडरवेअरवर पडलेले डाग नक्की कशाचे आहेत.

69

अंडरवेअरच्या मधल्या भागाचा रंग का जातो? तज्ज्ञांच्या मते, निरोगी योनीचे नैसर्गिक पीएच मूल्य ३.८ आणि ४. ५ दरम्यान असते. योनीमध्ये लैक्टोबॅसिली नावाचे चांगले बॅक्टेरिया असतात, जे चांगले ऍसिडिक सत्व पातळी राखून खराब जीवाणूंचा संसर्ग पसरण्यापासून थांबवतात.

79

जेव्हा तुम्ही ओव्ह्युलेशन काळात असता, तसेच गर्भधारणेदरम्यान योनीतून स्त्राव वाढतो. जेव्हा हा स्त्राव हवेच्या संपर्कात येतो तेव्हा ऑक्सिडेशनमुळे तुमच्या अंतर्वस्त्रावर पिवळा किंवा केशरी रंगाचा डाग पडू शकतो. ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने यावर तुम्हाला थेट उपाय करता येणे कठीण आहे. पण तुम्ही काही गोष्टींची काळजी नक्कीच घेऊ शकता.

89

ज्या दिवशी योनीतून स्त्राव जास्त होतोय असं तुम्हाला जाणवलं तर त्या दिवशी हलक्या रंगाच्या पॅटी निवडण्याचा प्रयत्न करू शकता, जेणेकरून हे डाग कमी दिसतील. तुम्ही पॅन्टी लाइनर्स वापरू शकता जे स्त्राव शोषून घेतात आणि पॅन्टीला डाग पडण्यापासून रोखू शकतात.

99

शक्यतो सुती अंडरवेअर वापरण्याचा प्रयत्न करा, कारण ते ओलावा व संक्रमण टाळतात. पण, तुम्हाला दुर्गंधी किंवा असामान्य रंग असा असामान्य स्त्राव दिसला तर, वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

  • FIRST PUBLISHED :