NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Interesting Facts : पक्षी उंच तारेवर झोपले असताना देखील खाली का पडत नाही?

Interesting Facts : पक्षी उंच तारेवर झोपले असताना देखील खाली का पडत नाही?

उंचावर पक्षी आपला तोल कसं सांभाळतात? यामागे नक्की काय कारण असू शकतं, चला जाणून घेऊ.

15

तुम्ही अनेकदा पक्षांना पाहिलं असेल की ते झाडाच्या फांदीवर किंवा मग विजेच्या तारेवर बसल्या बसल्या झोपतात. पण त्यांना पाहून तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की हे पक्षी असे उंचावर कसे काय झोपतात? ते आपल्या तोल कसं सांभाळतात? यामागे नक्की काय कारण असू शकतं, चला जाणून घेऊ.

25

उंचीवरून न पडण्यामागे ही 2 कारणे पक्षी तज्ञ म्हणतात की, पक्षी उंचीवरून का पडत नाहीत याची 2 प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे पक्ष्यांच्या पंजाची पकड खूप मजबूत असते.

35

जेव्हा ते विजेच्या तारांवर किंवा डहाळ्यांवर बसतात तेव्हा ते त्यांना नखांच्या मदतीने स्वत:ला त्या जागी लॉक करतात. ज्यामुळे ते खाली पडू शकत नाहीत.

45

झोपतानाही पक्षी उंचीवरून पडत नाहीत याचे एक कारण म्हणजे ते कधीही दोन्ही डोळे मिटून झोपत नाहीत, पण त्यांचा एक डोळा नेहमी उघडा असतो. या उघड्या डोळ्यामुळे त्याचा अर्धा मेंदू झोपेत असतानाही सक्रिय राहतो. या क्रियाशील मनामुळे पक्षी ताऱ्यांवर झोपूनही सावध राहतात.

55

त्यांचे हे वैशिष्ट्य त्यांना उंचावरून पडण्यापासून वाचवते. तसेच मांजरी किंवा इतर शिकारी प्राण्यांच्या धोक्यापासून देखील त्यांचे संरक्षण होते आणि ते त्यांची झोपही आरामात पूर्ण करतात.

  • FIRST PUBLISHED :