मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दारु उपलब्ध आहेत, ज्यामध्ये बिअर, व्हिस्की, वाईन, वोडका, फेनी येतात.
व्हिस्की देखील एक प्रकरची दारू आहे. जिला डायल्यूट करुन घेतलं जातं.
पण तुम्ही कधी व्हिस्कीच्या बटलीला नीट पाहिलं आहे का? ते ज्यापद्धतीनं बाटलीवर लिहिलं जातं ते पाहिलं आहे का?
जर तुम्ही नीट पाहिलंत तर तुम्हाला दिसेल की काही बाटलीवर Whisky आणि Whiskey लिहिलेलं असतं. पण मग Whisky आणि Whiskey मध्ये काय फरक आहे?
यामधील मुख्य अंतर हे दारु बनवणाऱ्या कंपनीमध्ये आहे. आयरलँड आणि अमेरिकामधील दारु बनवणारी कंपनी Whiskey लिहितात. त्यांनी ब्रँडला वेगळी ओळख देण्यासाठी एक्ट्रा शब्द E एड केला आहे.
भारतीय, स्कॉटिश, जपानी किंवा कनाडामधील दारु कंपनी Whisky लिहितात. तस स्कॉटलँडमध्ये बनलेल्या व्हिस्कीला Scotch Whisky म्हणतात.