टी-शर्ट घालायला सोयीस्कर असतात, घालायला किंवा उतरवायला सोपे असतात आणि ते कितीही प्रकारे दुमडले जाऊ शकतात. टी-शर्टशी संबंधित या सर्व फायद्यांची तुम्हाला माहिती असेलच, पण टी-शर्टच्या पुढे इंग्रजी अक्षर 'T' का लावले जाते हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
टी-शर्टच्या नावाचं रहस्य हे सोपं आहे आणि अनेकांना ते माहित असेल, परंतु आजही बरेच लोक आहेत ज्यांना याबद्दल माहिती नाही, म्हणूनच जेव्हा त्यांना या शब्दाचा अर्थ कळतो तेव्हा ते आश्चर्यचकित होतात.
द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, सध्या लोक सोशल मीडिया साइट टिकटॉकवर व्हिडिओ पोस्ट करत आहेत, ज्यामध्ये ते टी-शर्टचं रहस्य सांगत आहेत आणि ज्या लोकांना हे पहिल्यांदाच कळत आहे, त्यांच्या प्रतिक्रियादेखील येत आहेत.
टT-Shirt ला Tee-Shirt असंही लिहिलं जातं. पण 'T' लिहिण्यामागचं जे कारण आहे, त्यामागे 2 सिद्धांत अगदी सामान्य आहेत. पहिला सिद्धांत खूप सामान्य आहे जो कदाचित प्रत्येकाला माहित असेल. जेव्हा तुम्ही टी-शर्ट सरळ करता, त्याचा हात बाजूला पसरता तेव्हा त्याचा आकार इंग्रजी अक्षर 'T' सारखा दिसतो, म्हणूनच त्याला टी-शर्ट म्हणतात.
सामान्यतः जे गोलाकार गळ्याचे असतात त्यांना टी-शर्ट असं म्हणतात, म्हणजेच त्यांना कॉलर नसते. पण 'टी'च्या मागे दुसरा सिद्धांतही आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा टी-शर्ट बनवायला सुरुवात झाली तेव्हा लष्कराचे सैनिक ते ट्रेनिंगसाठी घालायचे.
ते गणवेशाखाली टी-शर्ट घालायचे आणि त्यातच शारीरिक प्रशिक्षणही घेत असे. या कारणास्तव त्यांना 'ट्रेनिंग शर्ट' किंवा टी-शर्ट असे संबोधले जाऊ लागले.
युनायटेड स्टेट्स नेव्हीने आपल्या नौदलाच्या सैनिकांसाठी 1913 च्या सुमारास टी-शर्ट बनवण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांनी ते त्यांच्या गणवेशाखाली घातले तर त्यांच्या छातीवरील केस गणवेशाच्या कडक कापडाला स्पर्श करून तुटू नयेत. यामुळेच त्यांनी सुती किंवा हलक्या कपड्यांचे टी-शर्ट घालण्यास सुरुवात केली.