वन्य प्राण्यांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच प्राण्यांच्या हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. वाघ आणि वाघिणीच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वाघिणीने हरणाची शिकार केली आणि ती आरामात बसून तिचं अन्न खात आहे. तेवढ्यात तिथे वाघ येतो आणि वाघिणीचं अन्न खायला लागतो. हे पाहून वाघीण संतापते आणि वाघावर हल्ला करते.
वाघ आणि वाघिणीमध्ये जोरदार भांडण होते आणि शेवटी वाघ वाघिणीला तिथून हरवण्यात यशस्वी होतो. वाघ त्या हरणाला ओढत झाड्यांमध्ये घेऊन जातो. वाघिण मात्र तिथे पाहातच राहते. शिकार करुनही तिच्या हाताला काहीच लागलं नाही.
हा रणथंबोर नॅशनल पार्कचा आहे असं म्हटल जात आहे. तो मूळ विजय कुमावत यांनी शूट केला आहे. आता या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत.
Latest Sightings नावाच्या यूट्यूब चॅनेलवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना मात्र फार आवडला आहे. लोक यावर भरभरुन कमेंट्स करत आहेत.