NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / भंगार झालेल्या बसला या माणसानं बनवलं Dream Place, आता गर्लफ्रेंडसोबत साजरी करतो सुट्टी!

भंगार झालेल्या बसला या माणसानं बनवलं Dream Place, आता गर्लफ्रेंडसोबत साजरी करतो सुट्टी!

Man Turned an Old Bus into Dream Place : काही लोकांच्या हातात असं कौशल्य असतं की, त्यांनी कोळशाला स्पर्श केला तरी ते सोनं बनतं. असंच कौशल्य ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ल्यूक व्हिटॅकरच्याही हातात आहे. त्याने स्क्रॅपयार्डमधून एक जुनी बस खरेदी केली, आणि या बसचं तयार केलं आपल्या स्वप्नातलं घर! (Scrapyard Bus Turned into Dream Home) आता तो या घरात आपल्या मैत्रिणीसोबत सुट्टी घालवतो. 37 वर्षीय व्हिटॅकरची ही बस पाहून कोणालाही इथं जाण्याची इच्छा होईल.

16

द सनच्या वृत्तानुसार, ल्यूक व्हिटॅकरने भंगारातून ही बस आणली होती. ती पाहून काही काळानंतर या बसचं इतक्या सुंदर घरामध्ये रूपांतर होऊ शकतं याची कोणी कल्पनाही केली नव्हती. ल्यूकने त्याच बसला इतकं सुंदर बनवलं आहे की, तो इथे प्रत्येक वीकेंड (weekend) साजरा करण्यासाठी येतो.

26

37 वर्षीय ल्यूकने कोरोनाच्या काळात आईवडिलांच्या घरी राहणं पसंत केलं. कारण, भाड्याच्या घरासाठी पैसे देऊन ते वैतागला होता. त्यामुळे तो त्याच्या वडिलांकडे शेतावर राहायला गेला. ब्रिटनमध्ये जेव्हा कोरोना पसरू लागला, तेव्हा हे कुटुंब सुरक्षित ठिकाणाच्या शोधात होतं. त्या सुमारासच ही बस ल्यूक आणि त्याचे वडील जो व्हिटॅकर यांच्या नजरेत आली.

36

दोघांनी मिळून ब्रिटनमधील हेयरफोर्ड शहरातून त्यांनी भंगारात उभी असलेली ही बस खरेदी केली. त्यांना बससाठी 1 लाख 29 हजार रुपये मोजावे लागले. बसचं इंजिन जॅम झालं होतं. त्यामुळे ती चालवता येणं शक्य नव्हतं. पण ती घरासारखी सजवणं शक्य होतं.

46

ल्यूकने त्याच्या अक्कलहुशारीचा चांगला उपयोग केला आणि त्याच्या DIY (डू इट युवरसेल्फ) कौशल्यांचा वापर करून, त्यांनी त्याचं घरामध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण मेकओव्हरसाठी त्याला 8 लाख 47 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. परंतु, फायनल टच अप जबरदस्त होता.

56

या बसमध्ये संपूर्ण व्हिटॅकर कुटुंब राहत होतं आणि त्यांनी 2 महिने इथं राहून लाखोंचं भाडंही वाचवलं होतं. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ते इथे राहू शकत होते. ल्यूक म्हणतो की, आम्हाला कोरोनापासून वाचण्यासाठी एका जागेची गरज होती आणि आम्ही इथे शिफ्ट झालो.

66

विशेष गोष्ट म्हणजे, यादरम्यान त्याला त्याची गर्लफ्रेंड निकिशा मॅकिंटोन्शही डेटिंग अॅपच्या माध्यमातून मिळाली. बसचं घर बनण्याच्या शेवटच्या टप्प्यातही तिनेही थोडी मदत केली आणि हे ठिकाण त्याच्यासाठी डेटिंगचे ठिकाण बनलं. आता दोघेही वीकेंडची सुट्टी या बसमध्ये एकत्र घालवतात. (सर्व फोटो क्रेडिट- Instagram/@toast_of_cirencester)

  • FIRST PUBLISHED :