सरडा न्यू गिनिया अशा नावाच्या सरड्याचं रक्त हे हिरवं असतं. ज्यामुळे हा सरडा संपूर्ण हिरवा असतो, त्याची जीभ आणि स्नायू देखील हिरव्या रंगाचे असतात.
आईसफिश हा मासा अंटार्क्टिक समुद्राच्या खोलवर आढळतो, जिथलं तापमान अतिशय थंड असचं. ज्यामुळे या फिशची रचनाच अशी आहे की त्याचं रक्त रंगहीन असतं. हे मासे देखील पारदर्शक असतात. म्हणजेच या माशाच्या रक्तात हिमोग्लोबिन आणि हिमोसायनिन नसतं.
ऑक्टोपस हा समुद्रीप्राणी आहे. ज्याला अनेक पाय असतात. या जीवाला अनेक देशात लोक आवडीने खातात देखील. परंतू या ऑक्टोपसचं रक्त लाल नाही कर निळं आहे. याच्या शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त आढळतं यामुळे त्याचे रक्त निळे असते.
पीनट वॉर्म ही एक प्रकारची अळी आहे, जिचं रक्त जांभळ्या रंगाचं आहे. जेव्हा हेमोएरिथ्रीन नावाचे प्रथिने शरिरात ऑक्सिडाइज केले जाते तेव्हा रक्ताचा रंग जांभळा किंवा कधीकधी गुलाबी असतो.
सी-कुकुम्बर या समुद्रा मिळणाऱ्या जीवाचा रंग हा पिवळा आहे. या जीवाचं रक्त पिवळं का आहे, याचं कारण आजपर्यंत शास्त्रज्ञांना कळू शकलेलं नाही.