मायक्रो ब्लॉगिंग साईट असणाऱ्या ट्विटरने मोठा निर्णय घेतला आहे. जर तुम्हालाही ट्विटरवर ब्लू टिक हवी असेल तर त्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. गुरुवारपासून नवा नियम लागू करण्यात आल्यानं भारतामधील अनेक सेलिब्रिटींचे ब्लू टिक गायब झाली आहेत.
ट्विटरच्या नव्या निर्णयानुसार आता कोणालाही ट्विटरवर ब्लू टीक सहज मिळवता येणार आहे, मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. वेब वापर कर्त्यांसाठी ही किंमंत आठ डॉलर प्रति महिना एवढी आहे. iOS आणि Android वापरकर्त्यांसाठी ही किंमत प्रति महिना 11 डॉलर इतकी आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर हँडलवरची ब्लू टिक गायब झाली आहे.
योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून देखील ब्लू टिक गायब झाली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर अकाऊंटवरून देखील ब्लू टिक हटवण्यात आलं आहे.
क्रिकेटर सचिन तेंडूलकर यांच्या ट्विटर अकाऊंटवरून देखील ब्लू टिक हटवण्यात आलं आहे.
सचिन तेंडूलकर यांच्याप्रमाणेच विराट कोहलीच्या ट्विटर हँडलवरून देखील ब्लू टिक गायब झाले आहे.