एखाद्या गुन्ह्यासाठी गाढवांना जेलमध्ये जावं लागल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? असं प्रकरण ६ वर्षापूर्वी उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यात झालं होतं.
यात आठ गाढवांना चक्क तुरुंगात टाकण्यात आलं होतं
जेल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महागडी झाडं नष्ट केल्याने या गाढवांना ही शिक्षा झाली होती
वनस्पती नष्ट करणं आणि गवत खाल्ल्याप्रकरणी या गाढवांना ४ दिवस तुरुंगात ठेवलं गेलं आणि नंतर सोडून देण्यात आलं
मिळालेल्या माहितीनुसार, या गाढवांनी महागड्या वनस्पती नष्ट करण्यासोबतच तिथे असलेलं गवतही खाल्लं, ज्याची किंमत तब्बल 5 लाख रूपये होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन आतमध्ये महागड्या वनस्पती लावण्यात आल्या होत्या.
याबाबत माहिती देऊनही गाढवांच्या मालकाने त्यांना तिथे सोडलं आणि गाढवांनी हे सगळं खाऊन घेतलं
पोलिसांनी या गाढवांना अटक केली आणि चार दिवसांनी त्यांना सोडून दिलं