मुख्यता नख कापण्यासाठी नेलकटरचा वापर केला जातो. शिवाय काही नेल कटरमध्ये दोन चाकू सारखी साधने देखील येतात. पण अनेकांना त्याचं योग्य काम किंवा वापर माहिती नाही. चला जाणून घेऊ.
नेल कटरचा वापर फक्त नखे कापण्यासाठीच होतो. त्यामुळे त्या शिवाय तो माणसाच्या काही कामाचा नाही, मग अशा परिस्थितीत त्याची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्यात २ चाकूसारखे उपकरण जोडण्यात आले. त्यानंतर आता नखे कापण्याशिवाय इतर अनेक कामांमध्ये याचा वापर करता येतो.
अनेकांना वाटते की या सुऱ्या आपल्याला नख साफ करण्यासाठी दिलेले असतात. पण त्याचा योग्य वापर काय आणि आता नेलकटरमध्ये असलेल्या या दोन धारधार गोष्टींचा वापर कशासाठी करता येतो? चला पाहू.
खरंतर नेलकटरला दोन सुऱ्या जोडल्यानंतर नेल कटरची उपयुक्तता एवढी वाढली आहे की, आता तुम्ही कोणत्याही सहलीला त्याला सोबत घेऊन जाऊ शकता. नेल कटर तुम्ही अनेक कारणांसाठी वापरू शकता. जर तुम्ही कुठेतरी बाहेर असाल आणि तुम्हाला बाटलीचे झाकण उघडायचे असेल तर त्यासाठी नेल कटर वापरा. नेल कटरवर एक लहान वक्र आकाराचा चाकू असतो, त्याच्या मदतीने तुम्ही बाटलीचे झाकण उघडू शकता.
तुम्ही सहलीवर असाल किंवा घराबाहेर असाल तर या छोट्या चाकूच्या मदतीने तुम्ही लिंबू, संत्री किंवा अशी कोणतीही वस्तू सहज कापता येईल. याशिवाय काही लोक या चाकूच्या धारदार टोकांचा वापर करून नखांची घाण साफ करतात. तथापि, असे करणे योग्य नाही, कारण जर थोडीशी चूक झाली तर त्याची तीक्ष्ण टोके तुमच्या बोटाला टोचू शकतात आणि तुम्हाला दुखापत करू शकतात.