NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / जिभेने हिरा चाटला तर काय होतं? खरंच माणूस मरतो का?

जिभेने हिरा चाटला तर काय होतं? खरंच माणूस मरतो का?

हिऱ्यांचे अनेक प्रकार असतात. ज्यामध्ये काही हिरे हे अगदी स्वस्तात मिळतात तर काहिंची किंमत अगदी करोडो रुपयात देखील असतेल.

16

आपल्याला तर हे माहित आहे की सोन्याला सर्वात जास्त डिमांड आहे आणि याचे दागिने सर्वात महाग असतात. पण असं असलं तरी हिरा किंवा डायमंडला देखील विसरुन चालणार नाही, कारण याची किंमत सोन्याहून जास्त आहे.

26

हिरे हे दागिन्यांमध्ये, तसेच काच कापण्यासाठी वापरतात. तुम्ही विज्ञानात वाचलं असेल की हिरा हा पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ आहे जो कार्बनचे घनरूप आहे. याशिवाय हिऱ्याला कार्बनचे शुद्ध स्वरूप म्हटले जाते. या पारदर्शक रत्नातून सहज पाहता येते. हिरे कॅरेटमध्ये मोजले जातात.

36

हिऱ्यांशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत, ज्याबद्दल तुम्ही बरंच काही ऐकलं असेल. जसे की काही लोकांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या व्यक्तीने हिरा चाटला तर त्याचा मृत्यू होतो. पण हे तर फक्त बोललं जातं, आता यामध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेऊ.

46

डायमंडचे Unknown Fact हिरा चाटल्याने माणसे मरतात, असे अनेक लोक अजूनही मानतात. पण असं नाही. हिरा हा विषारी पदार्थ नसल्यामुळे असे होत नाही. पण हो हिरा गिळणे तुम्हाला नक्कीच धोक्यात आणू शकते.

56

हिरा इतका कठोर का होतो? कार्बनपासून बनवलेल्या हिऱ्याच्या कडकपणाचे रहस्य म्हणजे त्याची रासायनिक रचना ज्यामध्ये कार्बनचे अणू एकमेकांशी खूप घट्ट बांधलेले असतात. यामध्ये, एक कार्बन अणू इतर चार कार्बन अणूंशी जोडला जातो आणि टेट्राहेड्रल भूमिती रचना तयार करतो.

66

हिऱ्याच्या वजनाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे 1 कॅरेट सुमारे 200 मिलीग्राम इतके असते. जर तुम्हाला वाटत असेल की हिऱ्याला तुम्ही दातांनी तोडू शकता, तर असं करणं जवळ-जवळ अशक्यच आहे. कारण आहे त्याची रचनाच. त्यामधील कार्बन पार्टीकल्स अशापद्धतीने घट्ट पकडलेले असतात की, तो दातांनी तोडणे अशक्य आहे.

  • FIRST PUBLISHED :