रस्त्यावरून चालताना तुम्ही ट्रॅफिक नियमांचं पालन करत असालच. पण तुम्ही रस्त्यावरील पट्ट्यांनुसार गाडी चालवता का? हे पट्टे खूप महत्वाचे आहेत आणि हे फक्त आपल्या सुरक्षिततेसाठी असतात. आज आम्ही तुम्हाला या स्ट्रिप्सच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेविषयी महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत, जिच्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल. भारतात प्रामुख्याने तुम्हाला रस्त्यावर या पाच प्रकारचे पट्टे दिसतील.
पांढऱ्या पट्ट्या - अनेक रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या असतात. यावरुन कळतं की, त्या रस्त्यांवर ओव्हरटेकिंग करता येते. मध्यभागीही यू-टर्न घेता येतो आणि लेनही बदलताही येते. हे करत असताना फक्त पुढे-मागे काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे.
सरळ पांढरी पट्टी - अनेक रस्त्यांवर तुटलेल्या पांढऱ्या पट्ट्या नाहीत तर दूरवर एक सरळ पांढरी रेषा तयार केली आहे. या रस्त्यांवर लेन बदलता येत नाही, यू-टर्न घेता येत नाही, ओव्हरटेक करता येत नाही. तुम्ही ज्या लेनमध्ये चालत आहात, त्या लेनमध्ये तुम्हाला सरळ चालत राहावे लागते. अपघात टाळायचा असेल किंवा वळण घ्यायचे असेल तेव्हाच लेन बदलता येते. असे रस्ते सहसा डोंगराळ भागात असतात जिथे अपघाताचा धोका जास्त असतो.
पिवळी पट्टी - अनेक रस्त्यांवर सरळ पिवळ्या रेषा असतात ज्या नेहमी रस्त्यावर बनवल्या जातात. अशा रस्त्यावर ओव्हरटेकिंग शक्य आहे. परंतु केवळ आपल्या बाजूला राहून. लाइन ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये जाण्यास परवानगी नसते. हे अशा रस्त्यावर असतं जेथे सामान्यतः कमी व्हिजिबिलिटी असते.
दोन पिवळ्या रेषा- काही रस्त्यांवर वारंवार अपघात होतात आणि तिथे ओव्हरटेक केल्यास लोकांचा मृत्यू होऊ शकतो. अशा रस्त्यांवर दोन पिवळ्या रेषा केल्या असतात. हे पट्टे म्हणजे सर्वात कठोर नियमावली आहे. यामध्ये ओव्हरटेक करणे, लेन बदलणे, यू-टर्न घेणे याला सक्त मनाई आहे. आपल्या लेनमध्ये असतानाही ओव्हरटेक करू शकत नाही.
पिवळ्या रेषा – पांढऱ्याप्रमाणेच काही रस्ते तुटलेल्या पिवळ्या रेषांनी बनलेले असतात. ही सर्वात उदार लाइन मानली जाते. यामध्ये, तुम्ही तुमच्या लेनमध्ये राहून यू-टर्न घेऊ शकता, ओव्हरटेक करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही लाइनच्या पलीकडे जाऊन ओव्हरटेक करू शकता, फक्त काळजी घेणे आवश्यक आहे.