दोघेही अगदी कमी लोकांच्या उपस्थीतीत लग्न करणार आहेत. ज्यामध्ये अगदी जवळची मंडळी असतील. तसेच नातेवाईक आणि मित्र परिवारासाठी ते रिसेप्शन पार्टी ठेवणार आहेत.
अथिया आणि केएल राहूल सुनिल शेट्टीच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर लग्न करणार आहे. इथे लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
यांच्या लग्नासंबंधी तर फोटो आलेले नाहीत, पण सुनिल शेट्टीचा बंगला नक्की दिसतो कसा, त्याची झलक तुम्ही फोटोंच्या माध्यमातून पाहू शकता.
अथिया आणि केएल राहूल खंड्याळ्याच्या ज्या बंगल्यावर हे दोघेही लग्नगाठ बांधणार आहे. तो बंगला कोणाच्याही स्वप्नातल्या बंगल्यापेक्षा कमी नाही.
मोठ-मोठ्या सेलिब्रिटींकडे ही नसेल असा भव्य, सुंदर आणि कॉस्टली असा बंगला आहे.
या बंगल्यात राहाताना तुम्ही निसर्गाशी जोडले जाल असं त्याचं खूपच सुंदर डिझाईन आहे.
डायनिंग, बाल्कनी एरिया, स्विमिंग पूल, बाहेरचे लॉन, तसेच मिनी थिएटर अशा गोष्टी त्याच्या घरात आहेत.
शिवाय खूप असंख्य झाड आणि वेगवेगळ्या आकाराच्या दगडांनी त्याचं घर सजवलं गेलं आहे.
सुनिल शेट्टीच्या सिनेमातील काही आठवणी देखील या बंगल्यात जपल्या आहेत.