NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Banana Fun Fact : केळ हे नेहमी वाकडंच का असतं, कधी विचार केलाय?

Banana Fun Fact : केळ हे नेहमी वाकडंच का असतं, कधी विचार केलाय?

केळ हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि डॉक्टरही ते खाण्याचा सल्ला देतात. तसेच हे इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्याने ते सगळ्यांच्या खिशाला परवडणारा असतो. काही लोक दररोज केळी खातात. पण तुम्ही केळ्याबद्दल एक गोष्ट नोटीस केलीय का? केळ कधीही सरळ का येत नाही? ते नेहमी वाकडं का असतं? चला यामागचे कारण समजून घेऊ.

16

आपल्याला हे तर माहित आहे की केळी झाडावर उगवतात. आधी झाडाला त्याचे फूल येते. नंतर या फुलांच्या पाकळ्या खाली केळीच्या लहान फळांची रांग वाढू लागते. एकदा का ते फळ आकाराने खूप मोठे झाले की, केळ्याचे फळ एका प्रक्रियेतून जाते, ज्याला सायन्समध्ये निगेटीव्ह जिओट्रोपिझम म्हणतात.

26

आता हे तर झालं सायन्सचं पण साध्या भाषेत बोलायचं झालं तर या प्रोसेसचा अर्थ असा की केळ्याचे फळ इतर फळांप्रमाणे जमिनीच्या दिशेने न वाढता सुर्यप्रकाशाच्या दिशेने वाढते. म्हणजेच काय तर हे फळ वारच्या बाजूने वळू लागलं.

36

सहसा केळी अशा ठिकाणी किंवा भागात उगवतात, जिथे कमी सूर्यप्रकाश असतो. या प्रवृत्तीमुळे केळी नंतर सुर्यप्रकाश घेण्यासाठी वरच्या दिशेने वाढू लागतात, त्यामुळे केळीचा आकार वाकडा होतो.

46

आता केळीच्या इतिहासाबद्दल बोलूया. केळीची झाडे प्रथम पर्जन्यवनाच्या मध्यभागी होती. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश फारच पोहोचतो. अशा परिस्थितीत केळीच्या झाडांचा हा मुळ स्वभाव झाला असावा असं तुम्ही म्हणू शकता. यामुळेच केळी आधी जमिनीकडे आणि नंतर प्रकाश मिळेल तिकडे म्हणजे सूर्याकडे सरकतात, त्यामुळे केळीचा आकार वाकडा आहे.

56

केळीला आपण देवाच्या पुढ्यात ठेवण्यासाठी वापरतो, शिवाय याचे झाड किंवा पान देखील पवित्र मानले जाते; ज्याला आपण देवाच्या नैवेद्यासाठी किंवा पूजासाठी ठेवतो.

66

केळी हे एकमेव झाड नाही जे निगेटीव्ह जिओट्रोपिझमशी संबंधित आहे. सूर्यफुलाचे नाव तुम्ही ऐकले असेलच. त्याचे सूर्याशीही असेच नाते आहे. सूर्य जिकडे जातो तिकडे-तिकडे सूर्यफुलाचे फूलही वळते.

  • FIRST PUBLISHED :