NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / हनिमूनच्या नावाखाली सासूकडून 5 लाख घेतले अन् पत्नीला हातही लावला नाही, आता आला अडचणीत

हनिमूनच्या नावाखाली सासूकडून 5 लाख घेतले अन् पत्नीला हातही लावला नाही, आता आला अडचणीत

विवाहितेचा तिच्या पतीने शारिरीक संबंधाबाबत छळ केला. लग्नानंतर पतीने शारीरिक संबंध ठेवले नाहीत. त्याने नवरीच्या माहेरच्यांकडून हनिमूनच्या नावाखाली पाच लाख रुपये घेऊनही हनिमून साजरं केलं नाही, असा आरोप आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील आहे.

17

पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी पती आणि सासू यांच्याविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कोतवाली भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिचं लग्न 6 फेब्रुवारी रोजी बदायूं जिल्ह्यातील बिसौली कोतवाली भागात राहणाऱ्या तरुणाशी झालं होतं.

27

लग्नाच्या वेळी रोख रकमेसोबत लाखो रुपयांचं सामानही हुंडा म्हणून देण्यात आलं होतं. असं असूनही तिच्या पतीने हनिमून साजरं केलं नाही. याबाबत विचारलं असता पतीने सांगितलं की, सध्या मित्र-मैत्रीण म्हणून राहू.

37

महिनाभरानंतर विवाहितेने तिच्या सासू-सासऱ्यांना सांगितलं की, तिच्या पतीने हनिमून साजरं केलं नाही आणि आतापर्यंत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. यानंतर सासूने सांगितलं की मी मुलाशी बोलते.

47

शेवटी काहीच फायदा न झाल्याने वैतागलेल्या विवाहितेने आपल्या पतीसोबत अजूनही शारीरिक संबंध ठेवले नसल्याची बाब आईला सांगितली. विवाहितेच्या आईने आपल्या जावयाला याबद्दल विचारलं असता तो म्हणाला की नैनितालला जाऊन तो हनिमून करेल.

57

त्या व्यक्तीने हनिमूनसाठी सासूकडे दहा लाख रुपये मागितले, त्यावर विवाहितेच्या आईने पाच लाख दिले. असा आरोप आहे की पती विवाहित महिलेसोबत 7 मे रोजी हनिमूनसाठी नैनितालला गेला होता. मात्र दोन दिवस राहूनही हनिमून साजरा केला नाही. उलट विवाहित महिलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले.

67

विवाहित महिलेने नैनितालहून परतून आपल्या सासूला नवऱ्याच्या या कृत्याबद्दल सांगितल्यावर सासूने मुलाची बाजू घेत हनिमूनसाठीचे उरलेले आणखी पाच लाख रुपये मागितले.

77

त्यानंतर विवाहितेने सदर कोतवाली येथे पती आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :