NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / पावसाळ्यात सर्पदंशाच्या प्रकरणांमध्ये वाढ; घरात या वनस्पती लावल्यास साप आसपासही भटकणार नाहीत

पावसाळ्यात सर्पदंशाच्या प्रकरणांमध्ये वाढ; घरात या वनस्पती लावल्यास साप आसपासही भटकणार नाहीत

सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसात अनेक किडे आणि इतर जीव बाहेर येतात. त्यात अनेक विषारी सापांचाही समावेश आहे. साप बिळात राहत असले तरी पावसाळ्यात ते बाहेरही फिरताना दिसतात. पावसाळ्यात घरांमध्ये साप शिरण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. अनेकदा हे साप कधी घरात प्रवेश करतात, हे कळतही नाही. यापैकी काही विषारीही असतात. अशात ते माणसाला चावल्यास मृत्यूही होऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की अशी काही झाडं आहेत ज्यांना साप घाबरतात.

17

साप विषारी असो वा नसो, त्यांना पाहून कोणीही घाबरून जातो. सापाच्या अनेक प्रजाती आहेत. जगात क्वचितच असा कोणी असेल ज्याला सापाचा सामना करायला आवडेल. पावसाळ्यात तर हे साप अनेकदा घरातही शिरतात

27

सापाला घरापासून दूर ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. यापैकी एक म्हणजे वनस्पतींच्या मदतीने सापांना दूर ठेवणं. तुम्ही अशी काही झाडं घरात लावू शकता, जेणेकरून तुमच्या घराच्या आजूबाजूला साप भटकणारही नाहीत.

37

यामध्ये पहिलं नाव आहे सर्पगंध. या वनस्पतीच्या नावातच साप आहे. त्याची मुळे पिवळी किंवा तपकिरी असतात. तसंच, त्याची पानं चमकदार हिरव्या रंगाची असतात. असं म्हटलं जातं, की या वनस्पतीचा इतका दुर्गंध येतो की त्याचा वास येताच साप पळून जातात.

47

मगवॉर्टचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. या वनस्पतीला खूप तीव्र वास येतो. त्याचा वास इतका उग्र आहे की साप त्याच्या आसपास येणं टाळतात. या वनस्पतीच्या देखभालीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यामुळे त्या घरांमध्ये क्वचितच दिसतात.

57

या यादीत लसूण हे तिसरं नाव आहे. तुम्ही विचार करत असाल की लसणाचा वापर जेवणात होतो. पण त्याची झाडेही खूप उपयुक्त आहेत. त्यात सल्फोनिक ऍसिड असतं. त्याचा वास खूप तीव्र असतो. सापांना ते आवडत नाही. जर तुम्ही त्याचं रोप वाढवू शकत नसाल तर लसणाच्या पाकळ्यांमध्ये मीठ मिसळा आणि घरात ठेवा. त्याच्या वासामुळे साप घरात येत नाहीत.

67

आता चौथ्या नावाबद्दल बोलूया. त्यात लसणासारखं सल्फोनिक अॅसिडही असतं. या अॅसिडमुळे कांदे कापल्यावर डोळ्यात अश्रू येतात. सापांना हे आम्ल अजिबात आवडत नाही. अशा वेळी घराच्या अंगणात कांद्याची रोपे लावली तर साप येणार नाहीत. जर तुम्ही रोप लावू शकत नसाल तर कांद्याचा रस घराभोवती शिंपडा.

77

बरेच लोक चहासाठी लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा वापरतात. त्याचा चहा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. पण या गवताच्या वनस्पतीला येणारा वास मात्र सापाला आवडत नाही. अशा परिस्थितीत सापांबरोबरच डासही यापासून दूर पळतात.

  • FIRST PUBLISHED :