NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / जिथे भांडी धुण्याचं काम करायची त्याच रेस्टॉरंटची बनली मालकीण, 18 वर्षीय तरुणीची कमाल

जिथे भांडी धुण्याचं काम करायची त्याच रेस्टॉरंटची बनली मालकीण, 18 वर्षीय तरुणीची कमाल

तुम्ही कथांमध्ये ऐकले असेल, की हा उद्योगपती पंपावर पेट्रोल भरायचा, आज तो अब्जाधीश आहे किंवा अशाच अनेक कथा. पण प्रत्यक्षात अशा घटना फार कमी लोकांनी पाहिल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहोत.

17

तुम्ही कथांमध्ये ऐकले असेल, की हा उद्योगपती पंपावर पेट्रोल भरायचा, आज तो अब्जाधीश आहे किंवा अशाच अनेक कथा. पण प्रत्यक्षात अशा घटना फार कमी लोकांनी पाहिल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहोत.

27

एक 18 वर्षांची मुलगी, जिच्याकडे पैशांची कमतरता होती. त्यामुळे ती रेस्टॉरंटमध्ये काम करायची. तिथे भांडी धुवायची. पण आज तिने तेच रेस्टॉरंट विकत घेतलं. ही कथा फिल्मी वाटत असली तरी ती खरी आहे. अमेरिकेतील ओहायो येथे राहणारी 18 वर्षीय समंथा फ्राय रोसेली नावाच्या रेस्टॉरंटमध्ये भांडे धुण्याचं काम करत होती. पुढे ती कूक बनली.

37

CNBC शी बोलताना सामंथा म्हणाली, जेव्हा मी हायस्कूल पूर्ण केलं तेव्हा मी कॉलेजमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि पर्यावरण इंजीनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. या आधी काही बिझनेसचा विचारही मनात होता. विंटर ब्रेकमध्ये रोसेली येथे भांडे धुण्याची संधी मिळाली. तेदेखील केलं.

47

समंथाने सांगितलं की, यादरम्यान कळालं की रेस्टॉरंटच्या मालकाला ते विकायचं आहे. त्याची ब्रोकर्ससोबत चर्चा सुरू आहे. मग वाटलं, हे मीच का विकत घेऊ नये. मात्र यासाठी जेवढे पैसे हवे होते तेवढे नव्हते.

57

पण बराच काळ कॉलेजसाठी फंड बचत करत असल्याने काही पैसे जमा झाले. या पैशातून डाउन पेमेंट केलं. आता ती सर्वात तरुण रेस्टॉरंट मालक बनली आहे. फ्राय म्हणाली, जर मी सहा महिन्यांपूर्वी माझ्या बॉसला सांगितलं असतं की मला ते विकत घ्यायचं आहे, तर त्यांनी म्हटलं असतं की तुला वेड लागलं आहे का. पण आता धोका पत्करला आहे, त्यामुळे काय होतं, हे पाहणं बाकी आहे.

67

फ्राय म्हणाली, सध्या माझ्यासाठी सर्व काही नवीन आहे. मी इथे आठवड्यातून पाच दिवस राहते. बाकीचे 2 दिवस मी कॉलेजसाठी काम करते. मी रेस्टॉरंटचं नाव बदलण्याचा किंवा ते अपडेट करण्याचा विचार केला नाही, असं समंथा म्हणाली.

77

हे चांगल्या गुंतवणूकदाराचं लक्षण असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. कॉलेजच्या निधीतून तिने पैसे वाचवल्याने आम्हाला आश्चर्य वाटलं. तिच्या वयातील बहुतेक लोक असा विचार करू शकत नाहीत, असंही ते म्हणाले.

  • FIRST PUBLISHED :