NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Railway Track : सामान्यत: ट्रेनला दोन ट्रॅक असतात, पण बांगलादेशातील रेल्वेचे ३ ट्र्रॅक का असतात?

Railway Track : सामान्यत: ट्रेनला दोन ट्रॅक असतात, पण बांगलादेशातील रेल्वेचे ३ ट्र्रॅक का असतात?

बांगलादेशमध्ये काय ट्रेनला ३ ठिकाणी चाक असतात का? एकाच वेळी ट्रेन कशी तीन ट्र्रॅक वरुन धावू शकते. तर या मागाचं कारण इतिहासात लपलंय.

17

असे अनेक लोक आहेत, ज्यांनी आयुष्यात बऱ्याचदा रेल्वेने प्रवास केला असेल. काही लोक तर लोकल रेल्वेने दररोज प्रवास करतात. या प्रवासाच्या वेळी तुम्ही रेल्वे ट्रॅक देखील पाहिले असतील. हे ट्रॅक कधी सरळ असतात तर कधी एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. जिथून ट्रेन आपला ट्रॅक चेंज करते.

27

सामान्यता तुम्ही पाहिलं असेल की ट्रेनला धावण्यासाठी दोन ट्रॅक लागतात. दोन ट्रॅकवर एक ट्रेन धावते. कारण रेल्वेला दोन्ही बाजूने चाक असतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बांगलादेशमध्ये ट्रेन धावण्यासाठी ३ ट्रॅक असतात. मग असा प्रश्न उपस्थीत होतो की असं का? येथे असं का केलं जातं?

37

बांगलादेशमध्ये काय ट्रेनला ३ ठिकाणी चाक असतात का? एकाच वेळी ट्रेन कशी तीन ट्र्रॅक वरुन धावू शकते. तर या मागाचं कारण इतिहासात लपलंय.

47

खरंतर हा सगळा गेजचा खेळ आहे. वास्तविक, कोणत्याही देशातील रेल्वे ट्रॅक गेजनुसार तयार केले जातात. तुमच्या लक्षात आले असेल की, आपल्या देशातही काही ठिकाणी रेल्वे रुंद आहेत तर काही ठिकाणी जास्त अरुंद आहेत. या कारणास्तव, त्यांना लहान आणि मोठे ट्रॅक बसवले जातात, पण यावरुन सगळ्याच प्रकारची ट्रेन चालू शकत नाही.

57

दुसरीकडे, जर आपण बांगलादेशबद्दल बोललो तर तेथे ड्युअल गेजचा वापर केला जातो, ज्यामुळे तीन ट्रॅकसह रेल्वे ट्रॅक वापरला जातो.

67

बांगलादेशमध्ये सुरुवातीपासून ड्युअल गेजचा वापर केला जात नव्हता. हे तंत्रज्ञान नंतर आले. पूर्वी तेथे मीटरगेजचा वापर केला जात होता. पण ब्रॉडगेजची गरज असताना मीटरगेज बदलण्याचा खर्च खूप जास्त होता. तसेच तेथील सरकारला देशभर पसरलेले मीटरगेज रेल्वेचे जाळे बंद करायचे नव्हते.

77

अशा परिस्थितीत, तिथल्या सरकारने दुहेरी रेल्वे ट्रॅक बसवण्याचा निर्णय घेतला, यामुळे एकाच ट्रॅकवर दोन वेगवेगळ्या गेजच्या गाड्या चालवण्याचे काम करता येते . म्हणूनच त्याला मिश्र गेज असेही म्हणतात. हे दुहेरी गेज ब्रॉडगेज आणि मीटर गेज दोन्ही एकत्र करून तयार केले आहे. यामुळेच आज बांगलादेशात ब्रॉडगेज आणि मीटरगेज गाड्या एकाच ट्रॅकवरून धावतात.

  • FIRST PUBLISHED :