NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग नाही, आता थेट Divorced Photoshoot; सोशल मीडियावर का होतायत फोटो व्हायरल?

प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग नाही, आता थेट Divorced Photoshoot; सोशल मीडियावर का होतायत फोटो व्हायरल?

भारतात पहिल्यांदाच समोर आलं Divorced Photoshoot, कोणी आणि का केलं हे शुट? प्री वेडिंग, पोस्ट वेडिंगला मागे टाकत आता या फोटोशुटचीच रंगली चर्चा

16

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. ज्यामुळे तुम्हाला सोशल मीडियावर यासंबंधीत अनेक फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतील. हल्ली प्री-वेडिंग शूटचा क्रेज वाढला आहे. यासाठी कपल लांब फिरायला जातात आणि तिथे सुंदर असे फोटो काढतात. त्यानंतर लग्नाचे फोटो असा संपूर्ण फोटो पॅकेजच सध्याचे फोटो ग्राफर देऊ लागले आहेत. पण तुम्हाला माहितीय का की आता आणखी एक फोटोशूट हळूहळू ट्रेंड होत आहे, ते म्हणजे 'डिव्होर्स फोटोशूट'.

26

हो तुम्ही बरोबर ऐकलंतर 'डिव्होर्स फोटोशूट' सध्या ट्रेंड होत आहे. ज्यामध्ये तरुणी डिवोर्स घेतल्यानंतर फोटोशुट करत आहेत आणि आनंदाने हे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तरुणी आनंदाने आपला घटस्फोट सेलिब्रेट करत आहेत. या आधी विदेशातून 'डिव्होर्स फोटोशूट'चा प्रकार पहिल्यांदा समोर आला होता. पण आता भारतात देखील तो केला गेला आहे. ज्यामुळे आता ही तरुणी चर्चेचा विषय ठरली आहे.

36

चेन्नईत राहणाऱ्या शालिनी नावाच्या महिलेने तिचे 'घटस्फोट फोटोशूट' करून घेतले आहे. आफल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर निराश होण्याऐवजी, तिने आनंदाने स्वीकारले आहे. ज्यामुळे तिने वेगळ्याच पद्धतीने फोटोशूट केले. जे तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोशुटच्या माध्यमातून शालिनीने भारतीय महिलांसाठी एक उदाहरण देखील समोर ठेवलं आहे.

46

लाल रंगाच्या स्लिट ड्रेसमध्ये शालिनीने सुंदर फोटोशुट केलं आहे. पहिल्या फोटोत, शालिनीने तिच्या हातात 'DIVORCED' अक्षरे हायलाइट करत फोटो काढले आहेत. दुसऱ्या फोटोत ती एका हातात दारूची बाटली आणि दुसऱ्या हातात बोर्ड घेऊन उभी आहे. तिसऱ्या चित्रात शालिनी स्वतःचा आणि नवऱ्याचा एकत्र फोटो फाडताना दिसत आहे. आणखी एका फोटोत शालिनी तिच्या नवऱ्याची फोटो फ्रेम पायाने चिरडताना दिसत आहे.

56

तसे पाहाता घटस्फोटबद्दल भारतीय महिला फारसा विचार करत नाही. आपल्या नवऱ्याला सोडून वेगळं राहणं त्यांना पटत नाही, ज्यामुळे त्या आपलं नातं नको असलं तरी देखील पार पाडण्याच्या विचारात असतात. तर काही भारतीय स्त्रिया भावनिक दृष्ट्या तुटतात आणि नैराश्यात जातात.

66

घटस्फोटित महिलांना संदेश पाठवण्याचा एक अनोखा मार्ग! तिच्या इंस्टाग्रामवरून हे फोटो छायाचित्रे शेअर करत शालिनी लिहिते, 'घटस्फोटित झाला म्हणजे सगळे संपलं असं नाही, हे तुमच्या जिवनात सकारात्मकता आणण्यासाठी महत्वाचं आहे. लग्नाला संपवूण एकटं उभं राहाणं तसं कठीण आणि हिंमतीचं काम आहे. तुम्ही आनंदी राहण्यास पात्र आहात आणि कधीही तडजोड करू नका, तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःचे आणि तुमच्या मुलांचे चांगले भविष्य घडवण्यासाठी आवश्यक बदल करा.'

  • FIRST PUBLISHED :