भारताचं सर्वात वजनदार रॉकेट असलेल्या जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल मार्क तीनद्वारे चांद्रयान-3 चं लॉन्च झालं. चांद्रयान-3 चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे.
सॉफ्ट लँडिंग करणं जर या चांद्रयानाला शक्य झालं तर भारत हा जगातील चौथा देश बनले. ज्या देशाकडे अशा प्रकारे मोहिम करण्याची क्षमता आहे.
यामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन देशांनी यापूर्वी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे.
चंद्रयान-3 यानात लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युल यांचा समावेश आहे. ‘एलव्हीएम-3’ प्रक्षेपण यानाच्या माध्यमातून ते अंतराळात आता झेपावलं आहे.
640 टन वजनाच्या या यानात 8 हजार किलोग्रॅम वजन पेलण्याची क्षमता आहे. ‘चांद्रयान-3’मोहिमेच्या माध्यमातून थेट चंद्रावर रोव्हर उतरवून तिथल्या वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे.
चांद्रयान-3 मोहिमेचं नेतृत्व रितू कारिधाल यांनी केलं आहे. ज्यांना 'रॉकेट वुमन' म्हणून संबोधलं जात आहे.
ही मोहिम व्यवस्थित पार पडल्यास 23 अथवा 24 ऑगस्टला यान चंद्रावर उतरवण्याची शक्यता आहे.