चाणक्य यांनी आपल्या धोरणात पुरुषांसाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे त्यांना त्यांचं नातं टिकवण्यात फायदा होईल. त्यांनी सांगितले आहे की, पुरुषांनी आपल्या पत्नीपासून नेहमी 4 गोष्टी लपवून ठेवाव्यात, नाहीतर त्यांचा संसार खराब व्हायला वेळ लागत नाही. चला जाणून घेऊया की त्या कोणत्या 4 गोष्टी आहेत, ज्या बायकोपासून गुपीत ठेवणं फायद्याचं आहे.
कमजोरी किंवा कमकुवतपणा पुरुषांनी आपली कमजोरी नेहमी पत्नीपासून लपवून ठेवावी. अन्यथा, ती वेगवेगळ्या प्रसंगी तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तिचे काम करून घेऊ शकते. ज्यामुळे सार्वजनिक जीवनात तुम्हाला या गोष्टीमुळे मान खाली घालावी लागू शकते.
कमाई पती-पत्नीसाठी चाणक्य नीतीनुसार पतीने पत्नीला त्याच्या कमाईबद्दल पूर्णपणे सांगू नये. याचे कारण म्हणजे नवऱ्याच्या खऱ्या कमाईची माहिती मिळाल्यावर ती त्याला स्वतःचे समजते आणि नवऱ्याला स्वत:साठी पैसे खर्च करण्यापासून रोखू लागते, तसेच बायकोला त्याचा एक-एक पैसा हवाहवासा वाटतो.
यासाठी काही बायका अपवाद असतात. पण असं असलं तरी काळजी घेतलेली केव्हा ही चांगली. आधी बायकोचा स्वभाव तपासा मगच तिला सांगा.
दान आचार्य चाणक्य यांच्या मते दान नेहमी गुप्तपणे केले पाहिजे. तुम्ही कुठे आणि किती दान केले हे तुमच्या पत्नीलाही सांगू नये. जर तुम्ही असे केले नाही तर त्या दानाची किंमत नाही आणि तुमचे सर्व चांगले कार्य व्यर्थ जाईल.
अपमान चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, बाहेर झालेला अपमान चुकूनही बायकोला सांगू नये. याचे कारण म्हणजे कोणतीही पत्नी आपल्या पतीचा अपमान सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत वाद शांत होण्याऐवजी रागात वाढू शकतो, ज्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो.