वरमाळेच्या आधी एका नवरीने लग्नाला नकार दिला. यानंतर तेथील लग्नाचं वातावरण तणावपूर्ण बनलं. मुलीला खूप समजावलं, मात्र ती तयार झाली नाही.
नवरीने सांगितलं, की हा मुलगा माझ्या लायक नाही. यादरम्यान अनेकांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती लग्न न करण्यावर ठाम राहिली. हे प्रकरण भागलपूरच्या रसूलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
भागलपूर जिल्ह्यात नवरीच्या दारात वरात आली होती. वरमाळेच्या वेळी नवरदेव स्टेजवर चढला असता अचानक नवरीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तेथील कॅमेरामनने घटनेचा व्हिडिओ बनवला.
नवरीच्या बहिणींनी तिची समजूत काढण्यास सुरुवात केली. यावर नवरीने वरमाला दरम्यान मुलाला हार घालण्यास नकार दिला. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नवरी म्हणाली की तो मुलगा माझ्या लायकीचा नाही. तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आणि काळा आहे. या दरम्यान अनेक तास तिला समजवण्याचा प्रयत्न केला गेला. पण या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही.
नवरीने लग्नास स्पष्ट नकार दिला. ती स्टेजवरून खाली उतरली आणि तिच्या घरी गेली. जर मी लग्न केलं किंवा कोणी जबरदस्तीने हे लग्न लावलं, तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी नवरीने दिली. त्यामुळे हे ऐकून नवरदेव आपल्या नवरीला न घेताच घरी परतला.
मुलीच्या वडिलांनी सांगितलं की लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, माझ्या मुलीने लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाला पाहिल्यानंतर त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तिने वराच्या गळ्यात माळही घातली नाही. माझ्या मुलीने असं का केलं हे आम्हाला माहीत नाही.