जगात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळतील. काही प्राणी तर असे असताता ज्याबद्दल आपल्याला माहिती देखील नसते.
सगळ्या प्राण्यांची आपली एक विशेषता असते ज्यासाठी ते जगभरात देखील ओळखले जातात.
यामध्ये आम्ही तुम्हाला अशा एका प्राण्याबद्दल सांगणार आहोत जो प्राणी आपल्या स्वत:च्या जीभेने स्वत:चा कान साफ करु शकतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. या प्राण्याची जीभ इतकी लांब आहे की तो थेट स्वत:च्या कानापर्यंत नेऊ शकतो.
हा प्राणी आहे जिराफ. त्याच्या उंची सोबतच त्याची जीभ देखील इतकी लांब आहे की तो आपल्या जीभेने आपले कान साफ करतो.
जिराफची जीभ जवळ-जवळ 20 इंचापर्यंत लांब असते. ती इतकी लांब असते की याच्या लांबीचा वापर करत जिराफाला आपलं कान स्वच्छ करता येतं.
कानच काय तर जिराफ आपल्या लांब जिभेचा वापर करुन आपले नाक देखील साफ करतो.