अंकिता बागडी हिने नुकतेच पश्चिम वर्धमान येथील कांकसा येथील शिवपूर प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला आणि जेव्हा जेव्हा अंकिता शाळेत येते तेव्हा मिठू नावाची मैना अंकितासोबत वर्गात येते. अंकिता जोपर्यंत वर्गात आहे, तोपर्यंत मिठूही तेथे थांबते आणि अंकिता घरी गेल्यावर मिठू परत आपल्या घरी जातो.
अंकिता मिठूच्या अन्न भरवते शिवाय मिठू सोबत खेळते देखील. या दोघांमधील हे बॉन्डिंग पाहून प्रत्येकालाच आश्चर्य वाटत आहे.
शिवपूर प्राथमिक शाळेत परिसरातील अनेक लहान मुले-मुली दररोज शिक्षणासाठी येतात. स्थानिक परिसरात राहणारी अंकिता बागडी हिला यावर्षी शिवपूर प्राथमिक शाळेत प्रवेश मिळाला आहे.आणि ज्या दिवसापासून अंकिताचा शाळेत प्रवेश झाला, त्या दिवसापासून मिठू तिच्यासोबत शाळेत येत आहे.
अंकिता इतर मैत्रिणींसोबत शाळेत येते तेव्हा मिठू झाडावरून उडून अंकिताच्या खांद्यावर किंवा डोक्यावर बसतो. जोपर्यंत अंकिता वर्गात आहे, तोपर्यंत मिठू तेथे थांबते. अंकिता प्रेमाने मिठूला बिस्किटाचा तुकडा देते. अंकिताला पाहून आता इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनीही मिठूच्या अन्न देतात.
अंकिता म्हणते की, ज्या दिवशी ती मिठूला पाहत नाही, तेव्हा ती अस्वस्थ होते. तसेच शिक्षकांनी सांगितले की, ज्या दिवशी अंकिता शाळेत येत नाही त्या दिवशी मिठू दिसत नाही. ती इकडे तिकडे अंकिताला शोधत फिरते. कधी कधी मिठू अंकिताच्या घरी देखील जाते. यादोघांमधील ही मैत्री आणि असं प्रेम पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. आता फक्त अंकिताच नाही तर शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांपासून सगळेच मिठूच्या प्रेमात पडले आहेत.