NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Tomato : फळ आहे का भाजी? भाव खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटो चर्चेत

Tomato : फळ आहे का भाजी? भाव खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटो चर्चेत

टोमॅटो फळ आहे का भाजी? अनेकदा लोकांमध्ये याचा संभ्रम आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ

16

टोमॅटोबाबत अनेक रिसर्च झाले आहेत. शास्त्रज्ञांनी आपापल्या तर्कांनुसार त्याचे फायदे आणि तोटे सांगितले आहेत. परंतु टोमॅटो भाजी आहे की फळं? यामध्ये नेहमीच मतभेद राहिले आहेत. काही शास्त्रज्ञांनी टोमॅटोला फळ म्हटलं आहे तर काहींनी भाजी.

26

टोमॅटोच्या गुणवत्तेच्या आधारावर ऑक्सफर्ड डिक्शनरीनं (Oxford Dictionary) त्याचा समावेश फळांच्या श्रेणीमध्ये केला आहे. डिक्शनरीनुसार, टोमॅटो हे एक मऊ लाल रसाळ फळ आहे. परंतु, ते प्रामुख्यानं भाजी म्हणून शिजवून किंवा कच्चं खाल्लं जातं. याशिवाय केंब्रिज डिक्शनरीमध्येसुद्धा (Cambridge Dictionary) टोमॅटोला फळाचा दर्जा दिलेला आहे. केंब्रिजनुसार टोमॅटो हे, अनेक बिया असलेलं लाल गोलाकार फळ आहे.

36

एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या (Encyclopedia Britannica) अहवालानुसार टोमॅटो फळच आहे. शास्त्रीय अभ्यासाचा आधार घेतल्यास कुठलंही फळ हे फुलांच्या अंडाशयातून (Flower ovary) विकसित होतं आणि त्यामध्ये अनेक बिया (Seeds) आढळतात. टोमॅटोचा जन्मही अशाच पद्धतीनं होतो. याशिवाय फळामध्ये असलेली आंबड-गोड चव आणि फायबर हे दोन्ही घटक टोमॅटोमध्ये आढळतात.

46

शास्त्रीय तर्कांचा आधार घेतल्यास टोमॅटो फळ असल्याचं सिद्ध होतं. मात्र, तरीदेखील टोमॅटोचा वापर फळ म्हणून नाही तर एक भाजी म्हणून केला जातो.

56

पाकशास्त्रानुसार (Culinary Science), जेवणामध्ये फळांचा वापर 'डेझर्ट' (desert) म्हणून तर, भाज्यांचा वापर 'मेन कोर्स' (Main course) म्हणून केला जातो. जगभरात टोमॅटोचा मेन कोर्समध्येच समावेश केला जातो. भाज्यांच्या सॅलेडमध्येही (Salad) त्याचा समावेश केला जातो. या तर्कानुसार टोमॅटोचा समावेश भाज्यांमध्ये होतो.

66

टोमॅटो हे फळ आहे की भाजी हा अजूनही वादाचा मुद्दा आहे. मात्र, टोमॅटोमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वं आढळतात आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं तुम्ही ते फळ म्हणून खा किंवा भाजी म्हणून शरीरासाठी ते फायद्याचं.

  • FIRST PUBLISHED :