NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / ऑस्करमधील थप्पड प्रकारानंतर Will Smith मुंबईत, सोबत भगव्या वेशातले साधू दिसल्यानं चर्चेला उधाण

ऑस्करमधील थप्पड प्रकारानंतर Will Smith मुंबईत, सोबत भगव्या वेशातले साधू दिसल्यानं चर्चेला उधाण

ऑस्कर-विजेता हॉलीवूड अभिनेता विल स्मिथ शनिवारी मुंबईतील एका खाजगी विमानतळावर दिसला. त्याने पांढरा ढगळ टी-शर्ट आणि पांढरी स्किन फिट पँट घातली होती. त्यावर गुडघ्यापर्यंत काळे शॉर्ट्स घातले होते. त्याच्या गळ्यात एक प्रकारचा हारही घातला होता. ऑस्कर वादानंतर स्मिथ पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या सर्वांसमोर आला आहे. त्याने गेल्या महिन्यात कॉमेडियन ख्रिस रॉकला आपल्या पत्नीविषयी आपत्तीजनक टिप्पणी केल्यामुळे ऑस्कर अकादमी पुरस्कार मंचावर थप्पड मारली होती. (फोटो सौजन्य : ANI)

17

53 वर्षीय सुपरस्टार ने प्रसारमाध्यमांकडे पाहून हात हलवला आणि त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांना नम्रपणे अभिवादन केलं.

27

अभिनेत्यासोबत साधूच्या वेशातील एक व्यक्ती होती. भगवी वस्त्रे परिधान केलेल्या साधूंसमवेत स्मिथने काय चर्चा केली हे समोर येऊ शकलेलं नाही.

37

ऑस्कर पुरस्कारादरम्यान घडलेल्या घटनेनंतर आणि त्यानंतर लागू झालेल्या बंदीनंतर स्मिथला सर्व बाजूंनी त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या अडचणी वाढत असताना तो मनःशांती मिळवण्यासाठी किंवा सल्ला घेण्यासाठी तो भारतातील साधूंकडे आला असावा का, अशी जोरदार चर्चा आहे.

47

'किंग रिचर्ड' चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या भारतात येण्याचा उद्देश जाहीर करण्यात आलेला नाही. पण, स्मिथची भारत भेटीची ही पहिलीच वेळ नाही. त्याच्या फेसबुक वॉच मालिकेचा भाग म्हणून त्याने 2019 मध्ये हरिद्वारला भेट दिली; आणि मुंबईत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मध्ये त्याच्या कॅमिओसाठी शूट केलं होतं. दरम्यान, ऑस्करमध्ये घडलेल्या 'थप्पड' घटनेनंतर स्मिथ स्पॉटलाइटपासून दूर राहिला.

57

सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार घोषणेवेळी रॉक बोलत होते. त्यावेळी त्यांनी पिंकेट स्मिथ यांच्यासंदर्भात GI Jane2 म्हणजेच केसविरहित डोक्याचा उल्लेख केला. पिंकेट स्मिथ यांना अलोपेसिआ (Alopecia) नावाचा आजार आहे. यामध्ये डोक्यावरचे केस जातात. यासंदर्भात पिंकेट स्मिथ यांनी जाहीरपणे या आजाराविषयी सांगितलं होतं. ख्रिस रॉक बोलत असताना स्मिथ व्यासपीठावर गेला आणि त्यांना थोबाडीत लगावली. 'तुझ्या बोलण्यात माझ्या बायकोचा उल्लेख करू नकोस' असं स्मिथ सांगत असताना दिसलं.

67

घटनेच्या काही मिनिटांनंतर, स्मिथला 94 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची घोषणा करण्यात आली. 'किंग रिचर्ड' मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी (मुख्य भूमिकेसाठी) त्याचा पहिला-वहिला ऑस्कर स्वीकारताना, स्मिथने अकादमी आणि सहकारी नामांकित व्यक्तींची माफी मागितली. परंतु, ख्रिस रॉकचा उल्लेख केला नाही. मात्र, त्याच्या वर्तनाबद्दल प्रतिक्रिया मिळाल्यानंतर, स्मिथने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ख्रिस रॉक आणि अकादमीची माफी मागितली.

77

'माझं वागणं योग्य नव्हतं आणि त्याचं समर्थन होऊ शकत नाही. ख्रिस, मी तुझी जाहीर माफी मागतो. मी शिष्टसंकेतांचा भंग केला. मी चुकलो मी संयोजकांची माफी मागतो. नॉमिनेशन मिळालेल्या कलाकारांची माफी मागतो. प्रेमात पडल्यानंतर माणूस अनेक अतर्क्य गोष्टी करतो. माझ्या हातून असंच काहीसं घडलं', असं स्मिथने म्हटलं. मात्र, अकादमीने स्मिथवर 10 वर्षांसाठी त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर बंदी घातली आहे.

  • FIRST PUBLISHED :