NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / राजपक्षे राजीनामा द्या.. राष्ट्रपती भवनासमोर तंबू ठोकून बसलेत श्रीलंकन नागरिक PHOTOS

राजपक्षे राजीनामा द्या.. राष्ट्रपती भवनासमोर तंबू ठोकून बसलेत श्रीलंकन नागरिक PHOTOS

श्रीलंका 1948 नंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून (Sri Lanka Crisis) जात आहे. यामुळे देशभरात आक्रोश आहे. राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) यांच्या कार्यालयासमोर लोकांनी निषेध शिबिरे उभारली आहेत. जोपर्यंत राष्ट्रपती राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत ते या छावण्यांमध्येच राहतील, असं त्यांचं म्हणणं आहे. (सर्व फोटो-एपी)

110

राजधानी कोलंबोच्या गॅले फेस ग्रीन परिसरात महागड्या हॉटेल्समध्ये रंगीबेरंगी तंबू दिसत आहेत. येथे पोर्टेबल टॉयलेटही बसविण्यात आले आहेत. लाऊडस्पीकरने भरलेल्या ट्रकमध्ये गाणी वाजवली जात आहेत. खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत. येथील वातावरण एखाद्या कार्निव्हलसारखं झालं आहे. लोक गाण्यांदरम्यान 'गो होम गोता'चा नाराही लावत आहेत.

210

मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. अनेक नागरिक हातात फलक घेऊन रस्त्यावर बसून देशाची विक्री करणं बंद करण्याविषयी निदर्शनं आणि निषेध करत आहेत. याठिकाणी आंदोलकांना आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स आणि पानही मिळत आहे.

310

लोकांनी राष्ट्रपती गोताबायांच्या विरोधात पोस्टरवर लिहिलंय, 'तुम्हाला तुरुंगात टाकल्याचं पाहिल्यानंतर हे सर्व संपेल. आम्ही येथे मौजमजा करण्यासाठी जमलेलो नाही. आपला देश परत घेण्यासाठी आलो आहोत.'

410

बहुतेक आंदोलक कोलंबोच्या उच्च आणि मध्यम वर्गातील आहेत - विद्यार्थी, शिक्षक, वकील, आर्किटेक्ट आणि सॉफ्टवेअर अभियंते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांना फक्त व्यवस्थेत बदल हवा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

510

देशातील 22 कोटी जनतेलाही दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होत आहे. इथल्या लोकांसाठी दूध सोन्यापेक्षा महाग झालंय. दोन वेळच्या जेवणासाठीही लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकारला जनतेच्या समस्या दिसत नाहीत.

610

श्रीलंकेतील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण आहे. पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नाही. देश आर्थिक, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे अस्थिर झाला आहे.

710

एफपीनुसार, श्रीलंकेवर सुमारे $51 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान चीनला होणार आहे. कारण, चीनने श्रीलंकेला सर्वाधिक कर्ज दिलं आहे. श्रीलंकेच्या एकूण बाह्य कर्जामध्ये चीनचा वाटा 10 टक्के आहे. चीननंतर जपान आणि भारताचं श्रीलंकेवर सर्वाधिक कर्ज आहे.

810

श्रीलंकेने एकूण कर्जाच्या 47 टक्के कर्ज बाजारातून घेतले आहे. त्याच वेळी, चीनचे कर्ज देशाच्या एकूण कर्जाच्या सुमारे 15 टक्के आहे. देशात आशियाई विकास बँकेचा 13 टक्के, जागतिक बँकेचा 10 टक्के, जपानचा 10 टक्के आणि भारताचा 2 टक्के हिस्सा आहे.

910

कमी परकीय चलनाच्या साठ्यामुळे सरकारने आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे देशात इंधन, दूध पावडर या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. महागाईने दुहेरी आकडा गाठला आहे.

1010

श्रीलंकेचे अर्थमंत्री अली साबरी म्हणाले की, इंधन आणि औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि आर्थिक संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी श्रीलंकेला पुढील सहा महिन्यांत सुमारे $3 अब्ज डॉलर्सची आवश्यकता असेल.

  • FIRST PUBLISHED :