NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / PHOTOS: जिम्नॅस्टपासून डान्सरपर्यंत... पुतीन फक्त राष्ट्राध्यक्षच नाहीत तर, इतक्या महिलांचे प्रियकरही

PHOTOS: जिम्नॅस्टपासून डान्सरपर्यंत... पुतीन फक्त राष्ट्राध्यक्षच नाहीत तर, इतक्या महिलांचे प्रियकरही

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे त्यांच्या आयुष्याशी संबंधित महिलांविषयी फारशी माहिती सार्वजनिक करू देत नाहीत. व्लादिमीर पुतिन यांनी 1983 मध्ये ल्युडमिला शक्रेबनेवाशी लग्न केलं. त्यांना आणि ल्युडमिला यांना मारिया वोरोंत्सोवा आणि कॅटरिना टिखोनोव्हा या दोन मुली आहेत. 2013 मध्ये पुतिन आणि ल्युडमिला वेगळे झाले.

17

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची माजी पत्नी ल्युडमिडा

27

कॅनेडियन-अमेरिकन अभिनेत्री पामेला अँडरसनचं नाव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत जोडलं गेलं आहे. पामेला अँडरसनचं पुतीन यांच्यासोबत अफेअर असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अभिनेत्रीकडून कधीही कोणतेही वक्तव्य आलेले नाही. (Instagram

37

2003 मध्ये, पुतीन यांचं नाव स्वेतलाना क्रिवोनोगिही यांच्याशी जोडलं गेलं होतं. या त्यांच्या आलिशान घरात घरगुती मदतनीस म्हणून काम करत होत्या. मीडियामध्ये असं वृत्त आहे की, पुतिन यांना स्वेतलानापासून एक मुलगीदेखील आहे. तिचं नाव लुईझ रोझोवा आहे. स्वेतलाना क्रिव्होनोगिख आता तिची मुलगी लुईझा रोझोवासोबत मोनॅकोमध्ये राहतात. तिथं त्यांच्या मालकीचं 4.1 दशलक्ष डॉलर्सचं अपार्टमेंट आहे. हे यापूर्वी Pandora Papersमध्ये उघड झालं होतं. लुईझा रोझोवा यांना एलिझावेटा क्रिव्होनोगिख असंही म्हणतात. (Twitter Image)

47

व्लादिमीर पुतीन यांचं नाव अॅना चॅपमन या रशियन गुप्तहेर महिलेसोबतही जोडलं गेलं आहे. ती एक मॉडेल देखील आहे. मात्र, पुतिन किंवा चॅपमन या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे बोललेलं नाही. अलीकडेच अॅना चॅपमनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. कारण, ती युक्रेनच्या मुद्द्यावर व्लादिमीर पुतीन यांचे समर्थन करत होती आणि रशियन सैन्याच्या हल्ल्याचं समर्थन करत होती. (Instagram)

57

व्लादिमीर पुतिन यांचं नाव रशियन ऑलिम्पिक जिम्नॅस्ट अॅलीना काबाएवा हिच्याशीही जोडलं गेलं आहे. पुतीन यांनी काबाएवाशी लग्न केले आणि दोघांना चार मुलं- दोन जुळ्या मुली आणि दोन मुलं असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. या सर्वांचा जन्म स्वित्झर्लंडमध्ये झाला. असंही म्हटलं जातं की, अॅलिना काबाएवा ही मुस्लिम होती आणि व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी तिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला. (FB Photo)

67

2016 मध्ये, अमेरिकन मासिक 'यूएस वीकली'नं दावा केला होता की, रशियाचे अध्यक्ष व्लामिदीर पुतिन मीडिया टायकून रुपर्ट मर्डोकची माजी पत्नी वेंडी डेंगला डेट करत आहेत. वेंडी डेंग 2014 मध्ये रूपर्ट मर्डोकपासून विभक्त झाली. मात्र, पुतीनसोबतच्या तिच्या अफेअरची कधीच पुष्टी होऊ शकली नाही. (Instagram Pic)

77

रशियाची प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर व्हिक्टोरिया लोपिरेवा ही व्लादिमीर पुतिन यांची Ex-Girlfriend असल्याचंही म्हटलं जातं. 2003 मध्ये ती 'मिस रशिया' झाली होती आणि 2018 मध्ये फिफा वर्ल्ड कपची ती अधिकृत राजदूत होती. पुढे व्हिक्टोरिया लोपिरेवा 'मिस रशिया पेजेंट'ची दिग्दर्शकही बनली. (Instagram)

  • FIRST PUBLISHED :