NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / Rupert Murdoch : 92व्या वर्षी पाचव्यांदा बोहल्यावर; पाहताक्षणी प्रेम अन् आता थेट बोहल्यावर

Rupert Murdoch : 92व्या वर्षी पाचव्यांदा बोहल्यावर; पाहताक्षणी प्रेम अन् आता थेट बोहल्यावर

रुपर्ट मर्डोक यांची वर्षभरापूर्वी लेस्लीसोबत भेट झाली होती. तेव्हा सुरुवातीला भीती वाटत होती की लेस्ली स्मिथ माझा प्रस्ताव नाकारणार तर नाही ना. मात्र अखेर धाडस करून लग्नासाठी विचारलं असं मर्डोक म्हणाले.

15

मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक हे वयाच्या ९२ व्या वर्षी पुन्हा संसार थाटणार आहेत. पाचव्यांदा प्रेमात पडलेल्या मर्डोक यांनी ६६ वर्षांच्या एन लेस्ली स्मिथसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. दोघांनीही याबाबत अधिकृत घोषणा केलीय.

25

मर्डोक यांनी खुलासा केला की, दोघांची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॅलिफोर्नियातील एका कार्यक्रमात भेट झाली होती. एन लेस्ली स्मिथ यांच्या पतीचे १४ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तर मर्डोक यांना आधीच्या पत्नींपासून सहा मुलं आहेत.

35

रुपर्ट मर्डोक यांनी न्यूयॉर्क पोस्टसोबत बोलताना म्हटलं की, सुरुवातीला भीती वाटत होती की लेस्ली स्मिथ माझा प्रस्ताव नाकारणार तर नाही ना. मात्र अखेर धाडस करून लग्नासाठी विचारलं आणि तिनेही स्वीकारलं. मर्डोक यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये चौथी पत्नी जेरी हॉलला घटस्फोट दिला होता.

45

लेस्लीच्या पतीला मर्डोक आधीपासून ओळखत होते. मर्डोक यांनी म्हटलं की, गेल्या वर्षी जेव्हा मी लेस्लीला कॅलिफोर्नियात पाहिलं तेव्हाच तिच्यावर प्रेम जडलं. त्या कार्यक्रमात २०० लोक होते आणि मी तिच्याशी थोडं बोललोही होतो. दोन आठवड्यांनी फोन करून मनातलं सांगितलं होतं.

55

लेस्ली स्मिथने म्हटलं की, रुपर्ट मर्डोक आणि मी एकत्र येणं हा दैवी आशीर्वाद आहे. मर्डोक यांच्यासारखेच माझे पती उद्योजक होते. मला विश्वास आहे की मर्डोक यांच्यासोबतचं नातं चांगलं असेल.

  • FIRST PUBLISHED :