पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर होते. इजिप्त दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी ऐतिहासिक 'अल हकीम' मशिदीला भेट दिली. यावेळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
बोहरा समाजाच्या अतिशय जुन्या मशीद अल-हकीमला पंतप्रधानांनी भेट दिली. ही मशीद 11व्या शतकात बांधण्यात आली होती.
मशिदीत पोहोचल्यावर दाऊदी बोहरा विभागातील लोकांनी पंतप्रधानांचे भव्य स्वागत केले आणि त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले.
पंतप्रधानांनी अल-हकीम मशिदीत सुमारे अर्धा तास घालवला. पंतप्रधानांनी सर्व गोष्टींचा बारकाईने आढावा घेतला
पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. 1997 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहे.
राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर रवाना झाले. शनिवारी पंतप्रधानांनी भारतीय समुदायातील लोकांची भेट घेतली.
आपला इजिप्त दौरा ऐतिहासिक असल्याचे वर्णन करताना पीएम मोदींनी लिहिले की, 'माझी इजिप्त भेट ऐतिहासिक होती. यामुळे भारत-इजिप्त संबंधांमध्ये एक नवीन गतिमानता येणार आहे. ज्याचा आपल्या देशांतील लोकांना फायदा होईल. मी राष्ट्राध्यक्ष अल-सिसी, सरकार आणि इजिप्तमधील लोकांचे प्रेमाबद्दल आभार मानतो.
मोदींनी रविवारी राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांच्याशी चर्चा केली आणि व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा संबंध आणि लोकांशी संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.