38 वर्षीय अलिना काबाएवा नॅशनल मीडिया ग्रुपच्या डायरेक्टरच्या पदावर होत्या. परंतु, आता या ग्रुपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलीनाचा फोटो अचानक गायब झाला आहे.
अलीनाचा फोटो अशा वेळी सोशल मीडियावरून हटवण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेने पुतीन यांच्या कुटुंबाला लक्ष्य करताना त्यांच्या दोन्ही मुलींवर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
पुतिन यांची संपत्ती त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असून ते त्यांची संपत्ती लपवत असल्याचं सांगत अमेरिकेनं पुतिन यांच्या दोन्ही मुलींवर निर्बंध लादले.
तुरुंगात असलेले विरोधी पक्षनेते अलेक्सी नॅव्हल्नी यांनी नॅशनल मीडिया ग्रुपबद्दल पोस्ट करत म्हटलंय की, मी तुम्हाला आठवण करून देतो की, नॅशनल मीडिया ग्रुप प्रचार यंत्रणेचा एक भाग आहे. त्यात पुतिन यांचा एक वैयक्तिक भाग आहे, जो औपचारिकपणे अलीना काबाएवा यांच्या नेतृत्वाखाली आहे म्हणून ओळखला जात होता.
दरम्यान, नॅशनल मीडिया ग्रुपमधून अलीना काबाएवाचा फोटो आणि नाव काढून टाकण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
सोशल मीडिया ग्रुपमध्ये अलीना नावाचा कॉलम रिकामा ठेवण्यात आला आहे. तर, इतर संचालकांच्या नावांचा त्यात समावेश आहे.
अलीना काबाएवाला कोणत्याही प्रकारचा मीडिया किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसायाचा अनुभव नव्हता. परंतु, असं असूनही तिनं संचालकपदाची सूत्रे हाती घेतली.
युद्धादरम्यान अलिनाच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये फारसा बदल झालेला नाही. याआधी डिसेंबरमध्ये त्यांचा मॉस्को येथील एक डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
अलीना आणि तिचं कुटुंब क्रेमलिनच्या एका मजबूत व्यक्तीसह स्वित्झर्लंड किंवा युरल्स, आर्क्टिक किंवा सायबेरियामधील बंकरमध्ये कुठेतरी लपलं असल्याचं मानलं जातं.
2013 मध्ये आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याआधी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, माझं खासगी आयुष्य आहे आणि मी त्यात कोणालाही हस्तक्षेप करू देत नाही. सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे.