सोमवारी सकाळी तुर्की आणि सीरिया शक्तिशाली भूंकपाने हादरले, 7.4 रिस्टर स्केल तीव्ररतेच्या भूंकपाची नोंद झाली आहे.
या भूंकपात आतापर्यंत 641 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या भूंकपामध्ये एक हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
भूकंपात इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या असून, लोक गाढ झोपेत असताना पहाटेच्या सुमारास हा भूंकप झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.
अनेक ठिकाणी भूंकपानंतर जमिनीला भेगा पडल्या असून, जमीन दुभंगल्याचं पहायला मिळत आहे.
भूंकपात जीवितहानीसोबतच मोठ्याप्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.
भूकंपानंतर तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मात्र अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.