NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / तालिबानविरुद्ध लढणाऱ्या पंजशीरची ताकद वाढली, अफगाणी सैनिक शस्त्रांसह आले मदतीला, पाहा PHOTOs

तालिबानविरुद्ध लढणाऱ्या पंजशीरची ताकद वाढली, अफगाणी सैनिक शस्त्रांसह आले मदतीला, पाहा PHOTOs

पंजशीरमधील नॉर्दन अलायन्सला (Northern Alliance) आता तालिबानविरोधात लढण्यासाठी अधिक बळ मिळालं आहे. अफगाणिस्तानच्या सैन्यात कार्यरत असणारे कमांडर्स आता पंजशीरच्या मदतीला धावून आले आहेत. हेलिकॉप्टरमधून शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा घेऊन ते अहमद मसूद यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत.

18

अफगाणिस्तानमधील पंजशील खोऱ्यावर ताबा मिळवण्यात अद्याप तालिबानला यश आलेलं नाही. इथं अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली 6 हजार सैनिक तालिबानसोबत लढा देण्यासाठी सज्ज आहेत. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेहदेखील याच भागात राहत आहेत. तालिबानसोबत चर्चा करायला आम्ही तयार आहोत, मात्र प्रसंगी लढाई करण्याचीदेखील आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया अहमद मसूद यांनी दिली आहे.

28

नॉर्दर्न अलायन्सला तालिबानविरोधात युद्ध लढण्यासाठी आता अधिकच ताकद मिळाल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हणण्यात आलं आहे. अफगाणी सेनेतल्या कमांडर्सनी आता मसूद अहमद यांच्यासोबत हातमिळवणी केली असून तालिबानला धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे.

38

तालिबानशी लढणाऱ्या या गटाच्या मदतीसाठी माजी राष्ट्रपती अहमद जिया मसूद आणि नॉर्दन अलायन्सचे पूर्व कमांडर अमानुल्लाह गुलजार हे पंजशीलमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत काही अफगाणी सैनिकदेखील आहेत.

48

हे नेते हेलिकॉप्टरमधून पंजशीलमध्ये दाखल झाले आहेत. हेलिकॉप्टरमधून त्यांनी काही शस्त्रास्त्रंदेखील सोबत नेली आहेत.

58

पंजशील ताब्यात घेऊ पाहणाऱ्या तालिबानींना अंद्राव, बगलान यासारख्या डोंगराळ भागात नॉर्दर्न अलायन्स कडवी झुंज देत आहे. जवळपास 300 तालिबानींना ठार केल्याचा दावा नॉर्दर्न अलायन्सनं केला आहे. मात्र तालिबाननं याचा इन्कार केला आहे.

68

AFP वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार नॉर्दर्न अलायन्सनं 9 हजार सैनिकांची फळी तालिबानविरुद्ध उभी केली आहे. या सैनिकांना ट्रेनिंग दिलं जात असून आधुनिक शस्त्रास्त्रांची जमवाजमवदेखील केली जात आहे.

78

आम्ही सरकार चालवण्यासाठी नव्या व्यवस्थेच्या शोधात असून चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे, मात्र प्रसंगी युद्धालाही तयार आहोत, असं या संघटनेच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

88

आता रक्तरंजित संघर्ष होणार की चर्चेतून तोडगा निघणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

  • FIRST PUBLISHED :