NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / अती तिथे माती! पत्ते खेळण्याच्या नादात देशालाच बुडवले, आता आले आर्थिक संकट

अती तिथे माती! पत्ते खेळण्याच्या नादात देशालाच बुडवले, आता आले आर्थिक संकट

Nepal Economic Crisis : आर्थिक संकट आणि कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्याचा हवाला देत नेपाळने दोन सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. तसंच, श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवणार नाही याची ग्वाही दिली आहे. (सर्व फोटो-एपी)

15

श्रीलंकेनंतर नेपाळमध्येही आर्थिक संकट गडद होऊ लागलं आहे. गेल्या 20 दिवसांपासून औषधांसह दैनंदिन वस्तूंच्या किमतीत वाढ होत आहे. नेपाळने गेल्या 5 वर्षांत परदेशातून 100 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे पत्त्यांचे कॅट आयात केले आहेत. पेट्रोल 41 रुपयांनी तर डिझेल 20 रुपयांनी महागलं आहे. एवढंच नाही तर, मोहरीच्या तेलाच्या (15 लिटरचा डबा) दरात 350 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नेपाळने दारू आणि तंबाखूसह कार आणि इतर महागड्या वस्तूंच्या आयातीवर औपचारिक बंदी घातली आहे.

25

वाढती आयात, घटलेला गुंतवणुकीचा प्रवाह आणि पर्यटन आणि निर्यातीतून कमी उत्पन्न यामुळे नेपाळमध्ये जुलै 2021 पासून परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. देशाच्या मध्यवर्ती बँक 'नेपाळ राष्ट्र बँके'चे डेप्युटी गव्हर्नर बम बहादूर मिश्रा म्हणाले, "मंगळवारपासून ही बंदी लागू झाली आहे आणि जुलै 2022 च्या मध्यापर्यंत लागू असेल. याबाबतची नोटीस नेपाळच्या राजपत्रातही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

35

'नेपाळ राष्ट्र बँके'चे डेप्युटी गव्हर्नर म्हणाले, "वेगाने कमी होत असलेले परकीय चलन थांबवण्यासाठी, कार, 250 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्स, 32 इंचापेक्षा जास्त मोठे कलर टीव्ही, तंबाखू आणि मद्य यासारख्या चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर सध्या बंदी घालण्यात आली आहे.''

45

रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांची आयात वाढलेल्या किमतीत वाढली असून, औषधांपासून ते सर्व खाद्यपदार्थ महाग होत आहेत. देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात 8 महिन्यांत 17 टक्क्यांनी घट झाली आहे. कोविडनंतर प्रभावित झालेल्या नेपाळसाठी पर्यटन हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे.

55

नेपाळने गेल्या पाच वर्षांत परदेशातून 100 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे पत्त्यांचे कॅट आयात केले आहेत. नेपाळमध्ये केवळ कॅसिनोमध्येच नव्हे तर दसरा, दिवाळीसारख्या प्रसंगी घरोघरी पत्ते खेळण्याची परंपरा आहे. केवळ दिवाळीच्या मुहूर्तावर 9 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पत्त्याच्या कॅटची आयात करण्यात आली.

  • FIRST PUBLISHED :