ग्रीसमध्ये दोन ट्रेनचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला असून, 85 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उसळले, स्थानिकांनी टॉर्चच्या मदतीनं बचावकार्य सुरू केलं.
ग्रीस मीडियाने दिलेल्या माहितीनुसार प्रवासी वाहतूक करणारी ट्रेन आणि मालवाहू ट्रेनमध्ये हा अपघात झाला आहे.
अपघातग्रस्त ट्रेन प्रवासी घेऊन एथेंच्या थेसालोनिकी शहराकडे जात होती. तर मालवाहू ट्रेन थेसालोनिकीकडून लासिसा शहराकडे येत होती, मात्र मध्येच हा अपघात झाला.
प्रत्यक्षदर्शीने केलेल्या दाव्यानुसार जेव्हा या दोन ट्रेनची धडक झाली त्यावेळी घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला होता. भूंकप झाल्यासारखे वाटत होते.