NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर सुरु आहे '50 रुपये'वाला स्कॅम, हुशार असाल तर आत्ताच सावध व्हा

WhatsApp वर सुरु आहे '50 रुपये'वाला स्कॅम, हुशार असाल तर आत्ताच सावध व्हा

व्हॉट्सअ‍ॅप हा असा अ‍ॅप आहे, जो तुम्हाला सगळ्याच लोकांच्या फोनमध्ये मिळेल, भारतातच काय तर अगदी जगभरातील लोक हा अ‍ॅप वापरतात. यावर लोक आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासोबतच ऑफिसची महत्वाची काम देखील करतात. सध्या शाळा आणि कॉलेजमधील लोक या अ‍ॅपवर अभ्यासासंदर्भात गोष्टींची देवाण-घेवाण करतात.

16

व्हॉट्सअ‍ॅपचा फायदा घेत अनेक सायबर गुन्हेगार या अ‍ॅपला टार्गेट करत आहेत आणि लोकांसोबत स्कॅम करत आहेत. स्कॅमर वापरकर्त्यांना अनेक प्रकारे फसवण्याचा प्रयत्न करतात. लोक आता जाणकार झाले आहेत, पण असं असलं तरी देखील हे ठग वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना गंडा घालत आहेत. आता वॉट्सअ‍ॅपवर लोकांना फसवण्याची नवीन पद्धत आली आहे. 'Rs. 50 per like' असा हा स्कॅम आहे.

26

घोटाळेबाज लोकांना नोकऱ्यांबद्दल मेसेज पाठवतात अशी बातमी अलीकडेच आली होती. जेव्हा कोणी त्यांच्याकडून नोकरीची माहिती घेते तेव्हा ते लोकांना सांगतात की, यूट्यूब व्हिडीओ लाइक करण्यासाठी तुम्हाला पैसे मिळणार, बाकी तुम्हाला काहीही करायचे नाही. स्कॅमर्सचा लोकांना असा दावा करतात की, यूट्यूब व्हिडीओला लाईक करून दररोज 5000 रुपये कमावता येतात.

36

यासाठी घोटाळेबाज केवळ व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनच नव्हे तर लिंक्डइन आणि फेसबुकच्या माध्यमातूनही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घोटाळे करणारे प्रथम बनावट नोकऱ्यांबद्दल सांगतात. ते सांगतात की फक्त मर्यादित स्लॉट शिल्लक आहेत, जर त्यांना त्यासाठी अर्ज करायचा असेल तर ते बुक करु शकतात.

46

मग अशातच एखाद्या युजर्सने या मेसेजला रिप्लाय करताच, स्कॅमर त्यांना कॉल करतात आणि सांगतात की YouTube व्हिडीओ लाइक करण्यासाठी पैसे दिले जातील. पीडितेला विश्वासात घेण्यासाठी ते सुरुवातीला काही रक्कमही देतात. पीडितेचा विश्वास जिंकल्यानंतर, ते म्हणतात की पेमेंट ट्रान्सफरमध्ये समस्या आहे. त्यानंतर सुलभ पेमेंट ट्रान्सफरसाठी अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सांगितले जाते.

56

या अ‍ॅपच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांना सर्व आर्थिक माहिती मिळते. पासवर्डशिवाय ओटीपी आणि ईमेल सारख्या माहितीचाही यात समावेश आहे. त्यानंतर हे गुन्हेगार तुमचं बँक अकाउंट खाली करतात.

66

हा घोटाळा टाळण्याचा मार्ग खूप सोपा आहे. यासाठी तुम्हाला अशा मेसेजकडे दुर्लक्ष करावे लागेल. काही पैसे मिळवण्याच्या नादात तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे गमावून बसता. कोणत्याही अनोळखी नंबरवरून लॉटरी किंवा इतर स्कॅम मेसेजपासून सावध रहा. अज्ञात व्यक्तीने दिलेल्या लिंकवरून कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करू नका. तुम्हाला कोणत्याही जॉब मेसेजबद्दल शंका असल्यास, तुम्ही थेट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून शोधू शकता.

  • FIRST PUBLISHED :