NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Refrigerator Maintenance: पावसाळ्यात सर्वच करतात फ्रिजच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष; पण याचे होतील गंभीर परिणाम

Refrigerator Maintenance: पावसाळ्यात सर्वच करतात फ्रिजच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष; पण याचे होतील गंभीर परिणाम

Refrigerator maintenance in monsoon: पावसाळ्यात फ्रिजकडे खास लक्ष द्यावे लागते. अन्यथा याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या कोणत्या गोष्टी आहेत याविषयी जाणून घेऊया.

16

पावसाळ्यात जेवढी काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागते, तेवढीच काळजी आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही घेतली पाहिजे. एसी असो, टीव्ही असो किंवा फ्रीज, त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांची लाइफ कमी होऊ शकते. स्वयंपाकघरातील एका आवश्यक गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर फ्रिजची विशेष काळजी घ्यावी लागते.

26

पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे जास्त ओलावा आणि त्यातून येणारे बॅक्टेरिया. फ्रीजमध्ये जास्त ओलावा असल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागते. याशिवाय पावसाळ्यात काही गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुमच्या अन्नावरही बुरशीची समस्या उद्भवू शकते.

36

पावसाळ्यात या त्रासांपासून दूर राहण्यासाठी, तुमच्या रेफ्रिजरेटरच्या दरवाजाच्या सीलमध्ये कोणतेही गॅप किंवा क्रॅक तर नाही ना हे सुनिश्चित करा. पावसाळ्यात फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नका आणि शक्य असेल तेव्हा 4-6 दिवसात फ्रीज चेक करत राहा. यावरुन तुम्हाला बुरशी येतेय की नाही हे कळेल.

46

दर काही दिवसांनी फ्रीज साफ करणे खूप महत्वाचे आहे., परंतु पावसाळ्यात, आपण नियमितपणे आपला फ्रीज स्वच्छ करण्याची सवय लावली पाहिजे. फ्रीजचे सर्व शेल्फ बाहेर काढा आणि कोमट पाणी आणि थोडे साबणाचे पाणी लावून आतील बाजू पूर्णपणे स्वच्छ करा.

56

रेफ्रिजरेटरचे गॅसकेट म्हणजेच रेफ्रिजरेटरच्या दारावरील रबरला देखील पावसाळ्यात बुरशी येऊ लागते. ते स्वच्छ करण्यासाठी त्यावर व्हाईट व्हिनेगर स्प्रे करा आणि पाच मिनिटे राहू द्या. यानंतर एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका आणि मिश्रण तयार करा.

66

नंतर सुती कापड त्या मिश्रणात भिजवून रबर स्वच्छ करा. यानंतर कोरड्या कापडाने पुसून टाका. यामुळे फंगस तर दूर होईलच, पण फ्रीजही चमकू लागेल.

  • FIRST PUBLISHED :