NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Android Tips and Tricks : फक्त प्रकाश देत नाही स्मार्टफोनचा टॉर्च, तर 'या' 3 सेटिंग पाहून तुम्हीही चक्रावाल

Android Tips and Tricks : फक्त प्रकाश देत नाही स्मार्टफोनचा टॉर्च, तर 'या' 3 सेटिंग पाहून तुम्हीही चक्रावाल

स्मार्टफोनमध्ये कॅमेरासाठी फ्लॅश देण्यात आला आहे. हे फ्लॅश टॉर्चचेही काम करते. बहुतेक Android यूझर्स पॅनेलमधून टॉर्च चालू आणि बंद करतात. पण, आम्ही तुम्हाला टॉर्चशी संबंधित काही सेटिंग्जबद्दल सांगणार आहोत, ज्या फार कमी लोकांना माहित आहेत.

16

फ्लॅशचा ब्राइटनेस: ही टॉर्चची अशी सेटिंग आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. बहुतेक फक्त मेनूमधून टॉर्च चालू किंवा बंद करतात. पण, जर त्यावर हलके खाली टॅप केले तर एक सेटिंग उघडेल. याच्या मदतीने तुम्ही फ्लॅशची इंटेंसिटी वाढवू किंवा कमी करू शकता.

26

नोटिफिकेशनमध्ये वापरा: नोटिफिकेशनसाठी तुम्ही मोबाईलमधील फ्लॅश किंवा टॉर्च देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेटिंगमध्ये जावे लागेल आणि तेथून Accessibility टॅप करावे लागेल.

36

आत गेल्यावर तुम्हाला Advanced Settings चा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप केल्यावर तुम्हाला फ्लॅश नोटिफिकेशनचा ऑप्शन दिसेल.

46

त्यावर टॅप करून आत आल्यावर तुम्हाला कॅमेरा फ्लॅश नोटिफिकेशन आणि स्क्रीन फ्लॅश नोटिफिकेशन असे दोन पर्याय दिसतील. यापैकी तुम्हाला पहिलं सिलेक्ट करावं लागेल. मग प्रत्येक नोटिफिकेशन टॉर्च लागेल.

56

टॉर्चमध्ये फाइल हाइड करा : खरंतर तुम्ही थेट टॉर्च ऑप्शनद्वारे फाइल हाइड करु शकत नाही. ते वापरण्यासाठी तुम्हाला Torch Vault नावाचे अॅप डाउनलोड करावे लागेल.

66

हे Torch Vault अॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळेल. त्यात टॉर्चचे बटण उपलब्ध आहे. ते ऑन-ऑफ केल्यावर, फोनचा टॉर्च फक्त चालू आणि बंद होईल. पण, आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की त्यावर तुम्ही तुमची फाइल लपवू शकता. तेही पासवर्डसह.

  • FIRST PUBLISHED :