NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Maruti Invicto:मारुतीची सर्वात महागडी 7 सीटर कार लॉन्च! जबरदस्त आहेत फिचर्स, पाहा किंमत किती?

Maruti Invicto:मारुतीची सर्वात महागडी 7 सीटर कार लॉन्च! जबरदस्त आहेत फिचर्स, पाहा किंमत किती?

Maruti Suzuki Invicto Launched in India Price features in marathi : Maruti Invicto टोयोटाच्या लोकप्रिय एमपीव्ही, इनोव्हा हायक्रॉसवर बेस्ड आहे. कंपनीने या कारमध्ये काही बदल केले आहेत. ज्यामुळे ही कार इनोव्हापेक्षा वेगळी ठरते. NEXA डीलरशिपद्वारे विकली जाणारीही ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधील ही सर्वात महागडी कार आहे.

16

मारुती सुझुकीने आज ऑफिशियली आपली नवीन 7-सीटर कार मारुती इनव्हिक्टो देशांतर्गत बाजारात लॉन्च केलीये. सुझुकी आणि टोयोटा यांच्यातील अॅग्रीमेंटवर तयार केलेली ही कार सध्याच्या टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे. मात्र कंपनीने या कारच्या लूकमध्ये आणि फीचर्समध्ये बदल केल्याने ती इनोव्हा पेक्षा वेगळी दिसते. या MPV ची सुरुवातीची किंमत 24.79 लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलसाठी 28.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

26

मारुती सुझुकीने नुकतीच Invicto साठी ऑफिशियल बुकिंग सुरू केली होती. जे कंपनीच्या प्रीमियम NEXA डीलरशिपद्वारे यासोबतच अधिकृत वेबसाइटद्वारे बुक केले जाऊ शकते. कार बुकिंगसाठी तुम्हाला 25,000 रुपये टोकन अमाउंट जमा करावी लागेल. कंपनीने ही कार एकूण तीन व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे, जी सिंगल इंजिन ऑप्शनसह येते. मारुती सुझुकीने हे 7-सीटर आणि 6-सीटर अशा दोन्ही लेआउटसह बाजारात लॉन्च केले आहे.

36

दिसायला ही कार Innova Hycross सारखीच आहे. पण कारच्या बाह्य भागामध्ये काही बदल आहेत. फ्रंटला स्प्लिट क्रोम ग्रिल आणि स्लीक एलईडी हेडलॅम्प्ससह डेटाइम रनिंग लाइट्स मिळतात. यामध्ये समोरच्या बंपरमध्ये फॉक्स स्किड प्लेटचाही समावेश करण्यात आलाय. त्याची साइड प्रोफाईल इनोव्हा सारखीच आहे, पण त्यात डायमंड कट अलॉय व्हील्स आहेत. यासोबतच, कारच्या मागील बाजूस नवीन डिझाइनचे तीन-ब्लॉक टेललॅम्प दिसतात, जे एका पातळ क्रोम स्ट्रिपने कनेक्टेड आहेत.

46

इंटीरियर आणि फिचर्स : या कारचं केबिन बहुतांश इनोवासारखंच आहे. Maruti Invicto मध्ये नवीन 10.1 इंचचा फ्री-स्टँडिंग ट्चस्क्री इंफोटेंमेंट सिस्टम देण्यात आलाय. जो वायरलेस अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉयड ऑटोला सपोर्ट करतो. यासोबतच चौकोन एयर कंडिशनर (AC) वेट्स, HVAC कंट्रोलला केबिनमध्ये जागा देण्यात आलीये. या कारमध्ये तुम्हाला 360 - डिग्री कॅमेरा, डिजिटल इंस्ट्रमेंट क्लस्टर, पॅडल शिफ्टर, वेंटिलेटेड फ्रंट सीट, पावर फ्रंट सीट्स, एम्बीएंट लायटिंग, पावर्ड टेलगेट, पॅनोरमिक सनरुफ, लेदर सीट्ससारखे फिचर्स मिळतात.

56

इंजन और परफॉर्मेंस: इंजिन आणि परफॉर्मेंस: मारुती इन्व्हिक्टो कंपनीने फक्त एका इंजिन ऑप्शनसह सादर केली आहे. त्यामध्ये 2.0 लिटर क्षमतेचे हायब्रीड इंजिन देण्यात आलेय. हे इंजिन 172 Bhp पॉवर आणि 188 Nm टॉर्क जनरेट करते. ही एक हायब्रिड कार असल्याने, तिला इलेक्ट्रिक मोटर देखील मिळते जी कारला अतिरिक्त पॉवर आउटपुट प्रदान करते. हे इंजिन ई-सीव्हीटी ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, त्यात मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध नाही.

66

मारुती सुझुकीने ही कार Advanced Driving Assistance System (ADAS) ने सुसज्ज केली आहे. ज्यामध्ये विविध सर्वोत्तम सेफ्टी फिचर्स मिळतात. यात लेन कीप असिस्ट, ब्लाइंडेड स्पॉट मॉनिटर, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, प्री-कॉलिजन सिस्टीम यांसारख्या सुविधा आहेत. यासोबतच 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) या वैशिष्ट्यांमुळे ही MPV आणखी चांगली बनते.

  • FIRST PUBLISHED :