NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / LED की CFL? कोणता बल्ब लावण्यात हुशारी, वीज बिल कुठे कमी येतं?

LED की CFL? कोणता बल्ब लावण्यात हुशारी, वीज बिल कुठे कमी येतं?

फिलामेंट बल्बचे दिवस आता जवळपास संपले आहेत. आता लोकांकडे अनेक एनर्जी सेव्हिंग लायटिंग ऑप्शन्स उपलब्ध आहे. दरम्यान वीज वाचवण्यासाठी कोणता बल्ब चांगला याविषयी आपण जाणून घेऊया.

16

CFLs आणि LEDs कसे कार्य करतात ते प्रथम समजून घेऊया: ज्यावेळी तुम्ही CFL ऑन करता तेव्हा त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी ट्यूबच्या माध्यमातून पास होते. या ट्यूबमध्ये काही अल्ट्राव्हायोलेट लाइट उत्सर्जित करणारे केमिकल (आर्गॉन आणि पारा) असतात. मग हा अतिनील प्रकाश, जो मानवी डोळ्यांना दिसत नाही, ट्यूबच्या आतील फ्लोरोसेंट लेप (फॉस्फर) वर स्ट्राइक करतो.

26

मग काही काळानंतर हे एक्साइटेड कोटिंग व्हिजिबल लाइट उत्सर्जित करते. CFLs सुरू होण्यासाठी अधिक वीज वापरतात आणि त्यांना वार्म अप व्हायला एक किंवा दोन मिनिटे लागतात. परंतु, हे चालू होतात तेव्हा फिलामेंटच्या बल्बच्या तुलनेत 70 टक्के कमी वीज वापरतात.

36

आता जर आपण LED बद्दल बोललो तर ते एक लायटिंग टॅक्नॉलॉजी आहे. टीव्ही, डिजिटल वॉच आणि अनेक डिव्हायसेसमध्ये एलईडीचा वापर केला जातो. ज्यावेळी तुम्ही LED चालू करता, तेव्हा तुम्ही डायोड नावाच्या सेमीकंडक्टर मटेरियलच्या माध्यमातून इलेक्ट्रिक करंट पाठवता. ज्यावेळी इलेक्ट्रिक करंटचे इलेक्ट्रॉन सेमीकंडक्टरच्या माध्यमातून फअलो होतात तेव्हा लाइट निर्माण होते. पारंपारिक बल्बच्या तुलनेत ते 90 टक्के विजेची बचत करतात.

46

वीज बचतीच्या दृष्टीने कोणते चांगले आहे: CFL आणि LED दोन्ही ट्रेडिशनल बल्बपेक्षा जास्त वीज वाचवतात. परंतु, दोनपैकी सर्वात कार्यक्षम LED आहे. CFL सुमारे 25% अधिक एफिशिएंट आहेत, तर LEDs सुमारे 75% अधिक एफिशिएंट आहेत.

56

कोणता जास्त वेळ चालतो: LED आणि CFL दोन्ही जास्त काळ टिकतात. पण, इथेही LEDs पुढे आहेत.ट ्रेडिशनल बल्बचे आयुष्य 1000 तास आहे. तर CFL चे आयुष्य 10,000 तास असते आणि LED चे आयुष्य सुमारे 25,000 तास असते.

66

LEDs CFL पेक्षा जास्त एनर्जी एफिशिएंट आहेत. तसेच, CFL पेक्षा LED हे आरोग्य आणि पर्यावरणासाठी चांगले आहेत.

  • FIRST PUBLISHED :