NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / WhatsApp Features: तुम्हाला माहितीये का WhatsApp च्या या 4 सीक्रेट ट्रिक? अवश्य घ्या जाणून

WhatsApp Features: तुम्हाला माहितीये का WhatsApp च्या या 4 सीक्रेट ट्रिक? अवश्य घ्या जाणून

WhatsApp Secret Features:आपण सर्वजण बऱ्याच काळापासून WhatsApp वापरतोय. परंतु त्यात अनेक फिचर्स आहेत ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती नसते. चला जाणून घेऊया व्हॉट्सअॅपच्या अशाच काही सीक्रेट फीचर्सविषयी...

17

आपण वर्षानुवर्षे व्हॉट्सअ‍ॅप वापरतोय. पण त्याचे सर्व फिचर्स अनेकांना माहिती नसतील. व्हॉट्सअ‍ॅपच्या अशाच काही सीक्रेट ट्रिकविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हे फीचर्स जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

27

Blue Tick कशी बंद करायची: व्हॉट्सअॅपवर मेसेज आला तर तुम्हाला लगेच रिप्लाय देण्यासाठी वेळ नसतो. पण तुम्ही मेसेज पाहिलाय पण तुम्हाला सेंडरला हे कळू द्यायचं नसेल तर ब्लू टिक ऑफ करता येते.

37

यासाठी तुम्हाला Setting मध्ये जाऊन Account सिलेक्ट करा आणि Privacy मध्ये जाऊन Read Receipts ऑफ करा.

47

प्रोफाईल फोटो कसा लपवायचा : सोशल मीडिया आणि इन्स्टंट मेसेजिंग अॅपमुळे प्रायव्हसीला मोठा धोका निर्माण झालाय. प्रत्येकजण आपला फोटो, आपले लोकेशन आणि अनेक प्रकारचा डेटा अतिशय आरामात पाहू शकतात. पण आपली प्रायव्हसी किती महत्त्वाची आहे याची आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅपचा प्रोफाईल फोटोही पब्लिक ठेवू नये.

57

तुमचा डीपी कसा लपवायचा हे आपण पाहूया. यासाठी Settings मध्ये जाऊन Privacy मध्ये जाऊन Profile Photo सिलेक्ट करा आणि इथे Nobody निवडल्यास फोटो कोणाला दिसणार नाही. दुसरीकडे, तुम्ही Contacts निवडल्यास, ज्यांचे नंबर तुम्ही सेव्ह केले आहेत तेच फोटो पाहू शकतील.

67

WhatsApp Group Mute कसा करायचा: व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये बरेच लोक असतात. अशा वेळी ग्रुपवर सतत मेसेज पडत राहतात. त्यामुळे वारंवार नोटीफिकेशन येत राहतात आणि त्याचा त्रास होतो. म्हणूनच आवश्यक नसताना ग्रुप म्यूट केला पाहिजे. यासाठी तुम्हाला ग्रुपमध्ये जाऊन त्याच्या नावावर टॅप करावे लागेल, त्यानंतर Grip Info निवडा. येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रुपला 8 तास, 1 आठवडा किंवा 1 वर्षासाठी म्यूट करू शकता.

77

Last Seen लपवू शकता: लास्ट सीन पाहिल्यानंतर कोणीही तुम्हाला कधीही मेसेज करू शकते.परंतु ते बंद देखील केले जाऊ शकते जेणेकरून तुम्ही शेवटचे कधी अॅक्टिव्ह होता हे कोणालाही कळणार नाही. यासाठी तुम्हाला प्रायव्हसी मेनूमध्ये जावे लागेल, त्यानंतर तुम्हाला त्यात लास्ट सीन मिळेल. येथे तुम्ही Everybody निवडून प्रत्येकासाठी लास्ट सीन लपवू शकता. यासोबतच तुम्ही Contacts ही सेलेक्ट करु शकता.

  • FIRST PUBLISHED :