NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Power Saving Tips : फॉलो करा 'या' 5 छोट्या ट्रिक, लाइट बिल होईल अर्ध!

Power Saving Tips : फॉलो करा 'या' 5 छोट्या ट्रिक, लाइट बिल होईल अर्ध!

Power Saving Tips : आजकाल बहुतेक सर्व घरांमध्ये अनेक प्रकारची मशीन्स असतात. त्यामुळे वीज बिलही खूप जास्त येते. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केवळ छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास वीज बिल खूप कमी करता येते. अशाच 5 गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

15

24 डिग्रीवर AC चालवा: एअर कंडिशनर 24 डिग्रीवर चालवणे चांगले मानले जाते. या तापमानात एसी चालवणे आरोग्यासाठीही चांगले असते आणि त्यामुळे पैशांचीही बचत होते. एका स्टडीनुसार, एसीमध्ये प्रत्येक 1 डिग्री तापमान वाढवून 6 टक्के विजेची बचत केली जाऊ शकते. म्हणजेच, जर तुम्ही 18 अंशांऐवजी 24 अंशांवर एसी चालवलात, तर तुम्ही 36 टक्क्यांपर्यंत विजेचा वापर थांबवू शकाल.

25

BLDC फॅन्समध्ये करा स्विच: एनर्जी एफिशिएंट BLDC फॅन्सची लोकप्रियता हळूहळू वाढत आहे. या ब्रशलेस डायरेक्ट करंट मोटर्स (BLDC) डायरेक्ट करंट इलेक्ट्रिसिटीवर फंक्शन करतात. हे नॉर्मल इंडक्शन मोटर-बेस्ड फॅन्सच्या तुलनेत 60 टक्केपर्यंत वीजेचा वापर कमी करते.

35

इलेक्ट्रिक अप्लायन्स खरेदी करताना रेटिंग लक्षात ठेवा: तुम्ही घरासाठी एअर कंडिशनर, फ्रीज किंवा गीझरसारखे कोणतेही अप्लायन्स खरेदी करता. त्यांचे एनर्जी रेटिंग 3 किंवा 5 स्टार पर्यंत आहे हे पहा. या प्रोडक्ट्सची सुरुवातीची किंमत खूप जास्त असते. पण, ते विजेची बचतही करतात.

45

अप्लायंसेज पूर्णपणे बंद करा: बहुतेक लोकांना ही सवय असते की ते फक्त रिमोटने एसी, टीव्ही किंवा Xbox सेट बंद करतात. परंतु, आजची आधुनिक मशीन पुढच्यावेळी तेजीने चालण्यासाठी स्टँडबाय मोडमध्ये राहतात आणि इलेक्ट्रिसिटी कंज्यूम करतात. अशा वेळी ते पूर्णपणे बटण किंवा MCB ने बंद केलं पाहिजे.

55

जुना बल्ब बदलून LED लावा: जुने फिलामेंट किंवा CFL भरपूर वीज वापरतात. त्याच्या जागी एलईडी बल्ब लावले तर ते विजेची बचत करतील आणि पुरेसा प्रकाश देतील.

  • FIRST PUBLISHED :