NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / यशस्वी जयस्वालने कॅप्टनलासुद्धा टाकलं मागे, पाहा IPLमधले सर्वात कमी वयाचे शतकवीर कोण?

यशस्वी जयस्वालने कॅप्टनलासुद्धा टाकलं मागे, पाहा IPLमधले सर्वात कमी वयाचे शतकवीर कोण?

आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वालने शतक झळकावत सर्वात कमी वयात अशी कामगिरी करणाऱ्यांमध्ये चौथं स्थान पटकावलंय. याबाबतीत त्याने कर्णधार संजू सॅमसनला मागे टाकलं.

19

आयपीएलमध्ये कमी वयात शतक करणाऱ्यांमध्ये यशस्वी जयस्वालने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला मागे टाकलंय. वानखेडे स्टेडियमवर एका बाजूने फलंदाज बाद होत असताना दुसरी बाजू २१ वर्षीय यशस्वीने भक्कमपणे सांभाळली.

29

यशस्वी जयस्वालने 62 चेंडूत 16 चौकार आणि 8 उत्तुंग षटकारांसह 126 धावांची खेळी केली. यामुळे आयपीएलमध्ये शतक करणारा तो चौथा तरुण क्रिकेटर बनलाय. त्याने ही कामगिरी 21 वर्षे 123 दिवस वय असताना केलीय.

39

यशस्वीने याआधी 8 सामन्यात तीन अर्धशतके झळकावली होती. आता शतक झाल्यानतंर 9 सामन्यात त्याच्या नावावर 428 धावा जमा झाल्या आहेत. आरसीबीच्या फाफ डुप्लेसीला मागे टाकून यशस्वी जयस्वाल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

49

यशस्वी जयस्वालने याबाबतीत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला मागे टाकलंय. सॅमसनने सहा वर्षांपूर्वी दिल्लीकडून खेळताना धोनीच्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध तुफान शतक केलं होतं. सॅमसनने ही कामगिरी 22 वर्षे 151 दिवस वय असताना केली होती.

59

यशस्वी जयस्वालच्या शतकामुळे कमी वयाच्या शतकवीरांमध्ये सॅमसन पाचव्या क्रमांकावर घसरला. पुण्याविरुद्ध 2017 मध्ये सॅसमनने 66 चेंडूत 102 धावा केल्या होत्या.

69

तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा देवदत्त पड्डिकल आहे. त्याने 2021 मध्ये आरसीबीकडून खेळताना शतक केलं होतं. तेव्हा पड्डिकलचं वय 20 वर्षे 289 दिवस इतकं होतं.

79

दुसऱ्या क्रमांकावर भारताचा फलंदाज ऋषभ पंतचं नाव आहे. दिल्लीकडून खेळताना पंतने 2018 मध्ये हैदराबाविरुद्ध वादळी शतक झळकावलं होतं. पंत तेव्हा फक्त 20 वर्षे 218 दिवस वयाचा होता.

89

ऋषभ पंतने फक्त 63 चेंडूत 15 चौकार आणि 7 षटकारांसह 128 धावांची खेळी केली होती. अपघातानंतर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे ऋषभ पंत यंदाच्या आय़पीएल हंगामात खेळू शकलेला नाही.

99

सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये शतक झळकावण्याची कामगिरी मनिष पांडेने केली आहे. 2009 च्या आयपीएलमध्ये त्याने शतक झळकावलं होतं. 19 वर्षे 253 दिवस वय असताना त्याने ही कामगिरी केली होती. आजही त्याचा हा विक्रम अबाधित आहे.

  • FIRST PUBLISHED :