वुमन्स प्रीमियर लीगमध्ये बीसीसीआयने पाच संघांची विक्री केली असून यातून 4669.99 कोटी रुपये कमावले आहेत. महिला प्रीमियर लीगमध्ये अहमदाबाद, मुंबई, बंगळुरु, दिल्ली आणि लखनऊचे संघ असणार आहेत.
बीसीसआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटरवर म्हटलं की, पहिल्या WPLमध्ये संघांच्या बोलीने २००८ मध्ये पुरुषांच्या आयपीएल उद्घाटनाचे विक्रम मोडले आहेत.
अहमदाबादचा संघ अडानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेडने १२८९ कोटी रुपयांना खरेदी केला.
इंडियाविन स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईचा संघ खरेदी केला. यासाठी कंपनीने ९१२.९९ कोटी रुपये मोजले.
बंगळुरूचा संघ रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्सने ९०१ कोटी रुपयांना घेतला.
दिल्लीचा संघ जेएसडब्लू जीएमआर क्रिकेटने ८१० कोटी रुपयांना विकत घेतला.
कॅप्री ग्लोबल होल्डिंग्जने लखनऊच्या संघासाठी ७५७ कोटी रुपयांची बोली लावली.