भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून कसोटी मालिकेनंतर टी२० आणि एकदिवसीय मालिकासुद्धा होणार आहे. वर्ल्ड कप सुरू होण्यास अद्याप तीन महिने बाकी आहेत. त्यादृष्टीने टीम इंडियाची तयारी सुरू असतानाच भारतीय संघासाठी चांगली बातमी समोर आली आहे.
गेल्या दीड वर्षापासून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाबाहेर आहे. तो लवकरच पुनरागमन करेल. दिवसभरात तो नेटमध्ये आठ ते दहा षटके गोलंदाजी करत आहे. सध्या बुमराह नॅशनल क्रिकेट अकादमीत असून तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करतोय. जसप्रीत बुमराह संघात नसल्याचा मोठा फटका भारतीय संघाला महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये बसला आहे.
भारतीय संघ गेल्या वर्षी आशिया कप, टी २० कप बुमराहशिवाय खेळला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बुमराहची उणीव संघाला भासला. या तीन मोठ्या स्पर्धात भारतीय संघाला विजेतेपद पटकावता आलं नाही. बुमराहचे पुनरागमन झाल्यास भारतीय संघ भक्कम होईल.
श्रेयस अय्यरला आयपीएलच्या आधी दुखापत झाली होती. त्याने यंदाच्या हंगामात एकही सामना खेळला नव्हता. आता त्ययाने फलंदाजी सुरू केली असल्याची माहिती समोर येतेय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ४२ सामन्यात १६३१ धावा केल्या आहेत.
prasidh krishna