शोएब मलिक आणि सानिया मिर्झा... क्रीडाविश्वातली नेहमी चर्चेत असलेली जोडी. पण याच शोएब आणि सानियाच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सध्या जोरदारपणे सुरु आहेत. बातमी घटस्फोटापर्यंत गेल्याची चर्चाही सुरु आहे.
2010 साली सानिया मिर्झा आणि शोएबचं लग्न झालं होतं. त्यांना इझान नावाचा मुलगाही आहे.
पण 12 वर्षांनी शोएब आणि सानियाच्या नात्यात दुरावा येण्याचं कारण काय? तर याचं कारण शोएब मलिकनं केलेलं एक फोटोशूट असल्याचं बोललं जातंय.
या फोटोशूटमध्ये शोएब एका अभिनेत्रीसह दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला.
फोटो व्हायरल झाले आणि त्याचदरम्यान सानियानं एक इन्स्टाग्राम पोस्ट केली. 'दुखावलेलं मन घेऊन कुठे जायचं?' अशा आशयाची पोस्ट सानियानं केली होती.
दरम्यान फोटोतली ही महिला आहे पाकिस्तानी अभिनेत्री आणि यूट्यूबर आएशा ओमर.
आयेशा ओमर आणि शोएबचं फोटोशूट सध्या चांगलंच गाजतंय. त्यावर अजून तरी स्पष्टपणे सानिया किंवा शोएबकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. पण सोशल मीडियात मात्र त्यांच्या सगळं काही आलबेल नाही असंच चित्र आहे.