NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / WPL Auction 2023 : कोण आहे मल्लिका? WPLमध्ये ऑक्शनर म्हणून काम पाहणार

WPL Auction 2023 : कोण आहे मल्लिका? WPLमध्ये ऑक्शनर म्हणून काम पाहणार

पहिल्या महिला प्रीमियर लीगसाठी सोमवारी दुपारी अडीच वाजता लिलाव प्रक्रिया होणार आहे. यामध्ये पाच संघांमध्ये चढाओढ बघायला मिळणार आहे.

15

महिला प्रीमियर लीगसाठी सोमवारी लिलाव प्रक्रिया होणार आहे. आतापर्यंत आयपीएल लिलावावेळी रिचर्ड मॅडले, चारू शर्मा यांना लिलाव करताना पाहिलं आहे. पण WPLमध्ये मलिका आडवाणी ऑक्शनर म्हणून काम पाहणार आहे.

25

मलिका सागर आडवाणी ही मुंबईची असून ती आधुनिक आणि समकालीन भारतीय कला केंद्र मुंबईची सल्लागार आहे. याशिवाय आर्ट इंडिया कन्सल्टट्स फर्ममध्येही ती भागिदार आहे. २०२१ च्या कबड्डी लीगमध्येही ती ऑक्शनर होती.

35

बीसीसीआयने पाच संघांना किमान १५ खेळाडू घेण्याचं आणि किमान खर्च ९ कोटी रुपये असायला हवा असं सांगितलं आहे. तर सर्व संघांकडे १२ कोटी रुपये असतील. यामध्ये ते फक्त ६ परदेशी खेळाडू घेऊ शकतात.

45

लिलावात ४०९ खेळाडूंवर बोली लागणार असून यात २४६ भारतीय तर १६३ परदेशी खेळाडू असतील. या खेळाडुंना अष्टपैलू, यष्टीरक्षक, वेगवान गोलंदाज, फिरकीपटू, बॅटर यानुसार विभागण्यात आलं आहे.

55

महिला प्रीमियर लीगमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ति शर्मा, शफाली वर्मा, ऑस्ट्रेलियाची एलिसा पेरी, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन, न्यूझीलंडची सोफी डिवाईन आणि वेस्ट इंडिजची डिएंड्रा डॉटिन सर्वाधिक बेस प्राइज असलेल्या खेळाडू असणार आहेत.

  • FIRST PUBLISHED :