विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने 11 जानेवारी रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दोघांनी आपल्या मुलीचे नाव या दोघांच्या नावावरून 'वामीका' असे ठेवले.
विराट आणि अनुष्का यांनी अद्याप त्यांची मुलगी वामीका हीच चेहरा जगाला दाखवला नसला तरी दोघे तिचे काही क्युट फोटोस सोशल मीडियावर शेअर करतात.
विराट कोहली त्याची पत्नी आणि मुलीला त्याचे लेडी लक मानतो. 2 वर्ष खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराटने बऱ्याच कालावधीनंतर २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले होते. याचे श्रेय त्याने वामीका आणि पत्नी अनुष्काला दिले होते.
नुकतंच विराटने त्याचा आणि वामीकाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो वामीका सोबत स्विमिंग पूल शेजारी बसलेला दिसत आहे.
विराटने या फोटोला कोणतेही कॅप्शन दिले नसून केवळ हार्टचा पोस्ट केला आहे.
सध्या या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून केवळ चार तासात 6.5 मिलियन लाईक्स आणि 48 हजार कमेंट्स केल्या आहेत.