NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / कोहली 'विराट' विक्रमापासून एक पाऊल दूर; सचिन, जयसूर्याला टाकणार मागे

कोहली 'विराट' विक्रमापासून एक पाऊल दूर; सचिन, जयसूर्याला टाकणार मागे

Virat Kohli Record :भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध २७ जुलै पासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. सध्याचा विराटचा फॉर्म पाहता या मालिकेतच विराट हा माइलस्टोन गाठण्याची शक्यता आहे.

17

विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी उतरला तेव्हा तो त्याचा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. या दिवशी कोहलीने अशी कामगिरी केली जी ५०० सामने खेळून ९ खेळाडूंना करता आली नाही. विराटने ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावलं होतं.

27

५०० व्या सामन्यात शतक झळकावताच विराटने सचिन तेंडुलकरचे काही रेकॉर्ड मागे टाकले. सचिनने ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यांपर्यंत ७५ शतके केली होती. तर कोहलीने ७६ शतके केली आहेत. पण सचिनच्या तुलनेत विराटने कमी डावात ही कामगिरी करताना सचिनपेक्षा जास्त धावाही केल्या आहेत.

37

सचिनचा हा विक्रम मोडल्यानंतर आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट नव्या रेकॉर्डसाठी सज्ज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीची रेस एक दोन खेळाडूंसोबत आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र त्याचं निर्विवाद वर्चस्व आहे. वनडेमध्ये शतक असो की सरासरी कोणीही त्याच्या आसपास नाही.

47

विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त १०२ धावांची गरज आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध २७ जुलै पासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. सध्याचा विराटचा फॉर्म पाहता या मालिकेतच विराट हा माइलस्टोन गाठण्याची शक्यता आहे.

57

एका शतकानंतर विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये फक्त १३ हजार धावा पूर्ण करणार नाही तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमालासुद्धा मागे टाकेल. त्यासोबतच रिकी पाँटिंग, जयसुर्या यांनाही मागे टाकेल. विराटने ज्या वेगाने धावा केल्या आहेत तशा क्रिकेटच्या इतिहासात कुणीही केल्या नाहीयेत.

67

विराट कोहलीने आतापर्यंत २७४ सामन्यात २६५ डावात १२ हजार ८९८ धावा केल्या आहेत. १३ गजार धावा करताच तो वर्ल्ड नंबर वन बनेल. सर्वात वेगाने १३ हजार धावा करण्याची कामगिरी त्याच्या नावावर नोंद होईल.

77

विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४६ शतकांच्या मदतीने १२ हजार ८९८ धावा केल्या आहेत. सध्या खेळणाऱ्या क्रिकेटर्समध्ये विराट इतकी शतके कोणाचीही नाहीत. आतापर्यंत त्याने एकूण ७६ शतके केली आहेत. आता आशिया कप आणि वर्ल्ड कपमध्ये तो कसा खेळतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

  • FIRST PUBLISHED :